दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सन्मान; पालक आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भगवंत विद्यालयात एक प्रेरणादायी सत्कार समारंभ पार पडला. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ, माजी शिक्षक, आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भगवंत विद्यालय, मौजे हाडोंग्री यांच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच माजी मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. इयत्ता दहावीमध्ये उज्वल यश संपादन करणारे धीरज थोरात, भक्ती डंबरे, रिद्धी तळेकर, यथार्थ नागटिळक, नागेश तळेकर, दिशा तळेकर, नैत्री लोमटे या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक श्रीमंत शिंदे आणि नवनाथ डंबरे यांचा सहपत्नीक सत्कार माजी पंचायत समिती सदस्य मुक्ताप्पा तळेकर आणि शांतलिंग घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक आप्पाराव चकोर, अनिल तळेकर, भगवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील डोके, उपसरपंच रवींद्र लोमटे, किसन तळेकर, मनमत साखरे, बबन डोरले, गणेश खरात, रमेश सुतार, प्रकाश भाले, रविकिरण भोजने, रेवण बिडवे, महेश डंबरे, विक्रम जावळे, राहुल कदम, पद्मिनी कवडे, वैभव क्षीरसागर, कसबे, रामा सुरवसे, अंकुश डंबरे, नानासाहेब गपाट, कल्पना शिंगटे, क्षीरसागर, अभिमन्यू महाडिक, दयानंद टेकाळे, संध्या कदम, सुवर्णा थोरात, गोकुळदास कदम यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रकाश पवार यांनी केले.
