प्रा. डॉ. संजय बी. चोरडियांचे प्रतिपादन : सूर्यदत्तचे संस्कार जागतिक स्तरावर यशस्वी नेतृत्व घडवतात
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने यूकेमधील ‘यूके सूर्यमिलन २०२५’ या भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे नुकतेच लंडनमध्ये आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात युनायटेड किंगडममध्ये उच्च शिक्षण घेणारे आणि करिअरमध्ये यश मिळवणारे अनेक सूर्यन्स उत्साहाने सहभागी झाले.
लंडनमध्ये आयोजित या जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्यात सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ अचिव्हमेंट इन ग्लोबल करिअर’ने सन्मानित केले गेले.
यूकेमधील विविध विद्यापीठांना आठवडाभर भेटीदरम्यान, प्रा. डॉ. चोरडियांनी माजी विद्यार्थ्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि त्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक यशाबद्दल अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचे महत्त्वाचे टप्पे, भविष्यातील उद्दिष्टे आणि जागतिक स्तरावरच्या संधींबद्दल अनुभव शेअर केले.
त्यांनी आपले यश सूर्यदत्तमधील शिक्षण, मूल्ये आणि संस्कार यांमुळे शक्य झाले असल्याचे सांगितले. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये पुण्यातील बावधन कॅम्पसमध्ये ‘सूर्यमिलन’ सोहळा आयोजित केला जातो, ज्यात अनुभव शेअर करणे, कनिष्ठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणे यांचा समावेश असतो.
सूर्यदत्त माजी विद्यार्थी संस्थेचे ब्रँड अॅम्बेसेडर असून त्यांच्या यशातून संस्थेच्या मूल्यांचा ठसा उमटतो. सूर्यदत्त अल्युमनी असोसिएशन आणि अल्युमनी पोर्टलच्या माध्यमातून माजी आणि विद्यमान विद्यार्थ्यांमध्ये सतत संवाद, करिअर सपोर्ट व शैक्षणिक अपडेट्स पुरवले जात आहेत, ज्यामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांमधील सेतू अधिक मजबूत होत आहे.
तुमचे यश ही तुमच्या जिद्दीची आणि सूर्यदत्तमधून मिळालेल्या मूल्यांची ओळख आहे. जागतिक स्तरावर वाटचाल करताना सतत शिकणे आणि नैतिक नेतृत्व हेच तुम्हाला इतरांपासून वेगळे ठरवेल.सूर्यदत्तच्या एका लाखाहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी भारतात व जगभरात विविध क्षेत्रांमध्ये उच्च स्थान मिळवले आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
