सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : दक्षिण सोलापूरमधील मुळेगाव तांडा ते दोड्डी रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १२ जणांना ताब्यात घेत सहा लाख ४४ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी केली.
सत्यजीत ऊर्फ जितू धनसिंग पवार (वय ३८, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर), प्रेम अंबादास बडेकर (वय २१, रा. राजीव गांधीनगर, भवानी पेठ, सोलापूर), जावेद अब्दुलगफूर बिजापूरे (वय ३३, रा. शास्त्रीनगर, सोलापूर), शिवशंकर मोहन मस्के (वय ३६, रा. सिद्धार्थनगर सिव्हिल हॉस्पिटलजवळ, सोलापूर), सादिक बुडन बागवान (वय ३०, रा. शास्त्रीनगर, सोलापूर), व्यंकटेश त्रिंबक लेकरुवाळे (वय २४, डफरीन चौक, सोलापूर), हणमंतू लक्ष्मण पवार (वय ३५, रा. साईबाबा चौक, सोलापूर), स्वप्नील देविदास खैरमोडे (वय ३३, रा. शुक्रवार पेठ, भुई गल्ली, सोलापूर), जमीर महिबुब बागवान (वय ३०, रा. लक्ष्मी मार्केट, मुल्ला बाबा टेकडी, सोलापूर), अमीर ऊर्फ मुर्तुजा जैनुद्दीन शेख (वय ४१, रा. रविवार पेठ, सोलापूर), पद्माकर पांडुरंग कांबळे (वय २८, रा. दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर, मूळ- बाभळगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), संतोष बाबू राठोड (वय ३६, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर), भैय्या हैद्राबादवाले (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), रफिक (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मुळेगाव तांडा ते दोड्डी रस्त्यालगत (मौजे मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) अतिकबाबा दर्गासमोरील मोकळ्या जागेत अवैध जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छापा टाकून १२ जणांना ताब्यात घेऊन एक लाख १७ हजार रुपये रोख, ११ मोटारसायकली, ५ मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण सहा लाख ४४ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, समीर शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.














