मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी : आरोपींना दिले पुढील तपासासाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वाहन चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मार्केटयार्ड पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मार्केटयार्डमधील आंबेडकरनगर येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिले.
जैद जमीन दलाल (वय २०, रा. घोरपडी पेठजवळ, मोमीनपुरा, कब्रस्थान, पुणे), जैद अमजद खान (वय १९, रा. गरुवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत आंबेडकरनगर रिक्षा स्टँड येथे दोन वाहनचोर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीकडील वाहनाची वाहन पोर्टल ॲपवर माहिती घेतली असता गाडीचे मालक साईराज मुकेश बोराडे असे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बोराडे यांच्याकडे वाहनाविषयी खात्री केली. दोन्ही आरोपींची मेडिकल करून पुढील कारवाईसाठी डेक्कन पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सविता ढमढेरे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस हवालदार अशोक हिरवळे, पोलीस नाईक जाधव, पोलीस अंमलदार अनिस शेख, स्वप्नील कदम, संदीप सूर्यवंशी, लोणकर, अनिरुद्ध गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
