भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील लेक टाऊन सोसायटीमधील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रजमध्ये पैशासाठी शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विद्यांशी उत्कर्ष गुप्ता (वय ३४, रा. लेक टाऊन सोसायटी, कात्रज, पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अनिलकुमार गुप्ता (वय ६०, रा. कानपूर, उत्तर प्रदेश) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची मुलगी विद्यांशी उत्कर्ष गुप्ता हिचा विवाह उत्कर्ष गुप्ता याच्याबरोबर झाला होता. लग्न झाल्यापासून पतीकडून मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. त्या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पुढील तपास करीत आहेत.
















