फरासखाना पोलिसांची कामगिरी : लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रात्रीच्या वेळी एकट्या प्रवाशांना गाठून चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीचा फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पर्दाफाश केला. आरोपीकडून एक रिक्षा, एक लोखंडी छन्नी, लोखंडी चाकू, बजाज कंपनीची दुचाकी, दोन रियल मी कंपनीचे मोबाईल फोन, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण एक लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अभिषेक बाळू ससाणे ऊर्फ अभिषेक मनोज पाटील ऊर्फ भैय्या (वय २०, रा. स.नं.१३, जयभवानीनगर, कोथरूड) याला अटक केली असून, दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकट्या प्रवाशाला गाठून लुटणाऱ्यांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी जयभवानीनगर कोथरूड परिसरात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी कोथरूड परिसरात जाऊन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने दोन विधिसंघर्षित बालकांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे सहा हजार रुपये रोख आणि एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला. आरोपीकडून एक रिक्षा, एक लोखंडी छन्नी, लोखंडी चाकू, बजाज कंपनीची दुचाकी, दोन रियल मी कंपनीचे मोबाईल फोन, एस सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण एक लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. फरासखाना, विश्रांतवाडी, कोथरूड, शिवाजीनगर, येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींवर गुन्हे दाखल असून, चाकण आणि भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्याचा तपास सुरू असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिष गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, मेहबूब मोकाशी, मोहन दळवी, रिजवान जिनेडी, सचिन सरपाले, राकेश क्षीरसागर, संदीप कांबळे, समीर माळवदकर, ऋषिकेश दिघे, तुषार खडके, अजित शिंदे, शरद वाकसे, महावीर वलटे, पंकज देशमुख यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

 
			

















