आवृत्ती पुणे

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यावर बेटींग घेणारा जेरबंद

पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त : सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटींग घेणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून अटक करून 2 लाख 78 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

पत्नीला चौथ्या मजल्यावरुन ढकलून देणारा जेरबंद

कोंढवा पोलिसांत फिर्याद : सुपरवायझरसोबत भांडण न केल्याच्या रागातून पतीने केले कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीने सुपरवायझरबरोबर भांडण केले नाही म्हणून चौथ्या मजल्यावरून ढकलून देणाऱ्या पतीला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. हा प्रकार शनिवारी (दि. २२ जानेवारी २०२२) दुपारी घडला आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. नितीन दशरथ दहिरे (वय-32) असे … Read more

काळेपडळमधील हुक्का पार्लर चालविणारे दोघे जेरबंद

हडपसर पोलिसांची कारवाई : १५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काळेपडळ येथील ड्रीम्स नाईट हॉटेलवर छापा टाकून हुक्का चालविणाऱ्या दोघांना जेरबंद करून १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हडपसर पोलिसांनी २२ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई केली. जयदीप रामचंद्र पवार (वय २८, रा. पवार आळी, … Read more

ट्रकच्या धडकेत मोटारसायकल चालकाचा मृत्यू

हडपसर पोलिसांत फिर्याद : सासवड रस्त्यावर विठ्ठल पेट्रोलपंपासमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सासवड रस्त्यावर भेकारईनगर येथील विठ्ठल पेट्रोल पंपासमोर ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. २२ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अमेश अशोक मोरे (वय २८, रा. मोरेवस्ती, वडकीनाला, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव … Read more

सराईत गुंडाचा चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर चाकू हल्ला

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : धायरीतील पंचरत्न क्लासिक सोसायटीतील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमविवाहानंतर सातत्याने त्रास देत असल्याने माहेरी आलेल्या व मोबाईल ब्लॉक केल्याने चारित्र्याचा संशय घेऊन सराईत गुंडाने आपल्या पत्नीवर चाकूने पोटात वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बहिणीला वाचविण्यासाठी गेलेल्या मेव्हण्यावरही त्याने वार करुन जखमी केले आहे. धायरीमधील पंचरत्न … Read more

आजारी मालकाला ड्रायव्हरने घातला ५१ लाखांना गंडा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : आरोपीसह पत्नी, बहीण, भाऊ यांच्यावर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मालक आजारी असल्याचे सांगून बांधकामासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून वेळोवेळी बँकेतून पैसे काढले. कागदपत्रावर सह्या घेऊन त्यांची मोटार व मोटारसायकल विकून तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ … Read more

४२ वर्षीय महिलेवर अनैसर्गिक अत्याचार करणारे दोघे अटकेत

कोरेगाव पार्क पोलिसांत फिर्याद : असह्यतेचा गैरफायदा घेत धमकी देऊन केला अतिप्रसंग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पतीसमवेत रहात नसलेल्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिला धमकावून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार २०१८ पासून सुरु होता. भरत जेठामल गांधी (वय ५३, रा. एकबोटे कॉलनी) आणि दिलीप पुष्कराज … Read more

अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यास केले जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : ८१ लाखांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्यास जेरबंद करून ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा चौकात ही कारवाई केली. प्रवीण दुर्योधन जाधव (वय २६, रा. मु.पो. गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

फेसबुकवरील प्रेमसंबंधातून वकील महिलेला दीड कोटींचा गंडा

चतुर्श्रुंगी पोलिसांत फिर्याद : एका कंपनीचा संचालक असल्याचे सांगून घातली भुरळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका 45 वर्षीय वकील महिलेसोबत फेसबुकवर ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंधाचे नाटक करत तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. एका कंपनीचा संचालक असल्याचे भासवून या महिलेला भुरळ पाडली. वकिल महिलेला गंडा घातल्याच्या घटनेने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. … Read more

पैसे मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार करणाऱ्यावर गुन्हा

खडकी पोलिसांत फिर्याद : कोयता हवेत फिरवत माजविली दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तुला आईने दोन हजार रुपये दिले, ते परत दिले नाहीत, परत कसले पैसे मागतो असे म्हणाल्याने चिडून कोयत्याने वार करीत जखमी करणाऱ्यासह साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खडकीमधील गवळीवाडा वसाहत येथे २२ जानेवारी २०२२ रोजी साडेचारच्या सुमारास … Read more