आवृत्ती , पुणे

हाडोंग्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

51 वर्षांच्या परंपरेनुसार सामूहिक त्रिशरण पंचशील, मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांची रेलचेल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदाही मोठ्या उत्साहात व पारंपरिक श्रद्धेने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजन भागवत शिंदे (रिपाई, मराठवाडा उपाध्यक्ष) यांच्या हस्ते … Read more

प्रा. डॉ. तानाजीराव बोराडे यांना प्राध्यापक पदावर पदोन्नती

समाजशास्त्र विषयातील संशोधन कार्याची दखल; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. तानाजीराव बोराडे यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापक पदावर पदोन्नती दिली आहे. डॉ. बोराडे यांचे समाजशास्त्र विषयातील संशोधन, विविध शोधनिबंध लेखन, तसेच सामाजिक संशोधन … Read more

बसवेश्वरांच्या विचारांचे आचरणच खरी सामाजिक क्रांती – किरण कोरे

हाडोंग्री येथे बसवप्रतिष्ठानतर्फे बसवेश्वर जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : बसवप्रतिष्ठान, हाडोंग्री यांच्या वतीने सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून किरण कोरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महापुरुषांना डोक्यावर घेऊन … Read more

घरफोडीचे शतक केलेला ‘चोर राजा’ पुन्हा गजाआड

हडपसर पोलिसांची कामगिरी : तब्बल ३ महिने व ७०० किमीचा प्रवास, दोघा चोरट्यांसह सोनारालाही अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यात स्प्लेंडरवरून चोरटे येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यावरून हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तब्बल ३ महिने शहर व ग्रामीण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढला. रांजणगाव ते कात्रज या … Read more

तळेहिप्परग्यात हनुमान यात्रा डॉल्बीमुक्त वातावरणात संपन्न

मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग : शांततेत व पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक पार महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : पवन श्रीश्रीमाळ – सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे तळेहिप्परगा येथे ग्रामदैवत हनुमान देवाची यात्रा दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी डॉल्बी मुक्त वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर २४ एप्रिल रोजी किर्तन व भजनाचा कार्यक्रमही … Read more

बार्शीचा तेजस्वी तारा : डॉ. सारंग खडके यांची राष्ट्रपातळीवर दमदार झेप

NEET SS परीक्षेत राष्ट्रपातळीवर १७९३ वी रँक मिळवून बार्शीचे नाव उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – बार्शी शहराचा नावलौकिक उंचावणारी आणि प्रत्येक युवकाला प्रेरणा देणारी आनंददायक बातमी, बार्शीचे सुपुत्र डॉ. सारंग शरद खडके यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत २०२४-२५ च्या NEET SS (सुपर स्पेशालिटी) परीक्षेत राष्ट्रपातळीवर १७९३ वी मेरिट रँक मिळवली … Read more

बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड

२८ लाखांच्या बनावट नोटा जप्त : बँकेत बनावट नोटा जमा झाल्याने उघडकीस आला प्रकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये २०० रुपयांच्या ५५ बनावट नोटा जमा करण्यात आल्या होत्या. त्यावरून बनावट नोटा छापणारी टोळी शिवाजीनगर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २८ लाखांच्या … Read more

ग्रामपंचायत अधिकारी लाच घेताना जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : बिल काढण्यासाठी मागितली लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ग्रामपंचायत भांबर्डे येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महिला ग्रामपंचायत अधिकार्यास रंगेहाथ पकडले. निर्मला कैलास भुजबळ (वय ४४, रा. ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत भांबर्डे, ता. शिरूर) असे या अधिकार्‍याचे नाव … Read more

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ धनकवडी येथे कॅंडल मार्च आणि श्रद्धांजली

जैन समाजाच्या विविध संघटनांचा सहभाग : दोषींवर कठोर कारवाईची मागणी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ पुण्यातील धनकवडी येथे वर्धमान जैन स्थानक, बालाजी नगर आणि अरीहंत सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कॅंडल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी … Read more