आवृत्ती , पुणे

‘विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई..‌’

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित ‌‘विठू माऊली माझी‌’ कार्यक्रमात रसिकांनी केला विठू माऊलीचा गजर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विठ्ठल रूपाशी एकरूप झालेल्या संतांना ज्ञानदृष्टीने अनुभवास आलेला ज्ञानियांचा राजा विठ्ठल, त्याला मातृरूपात पाहताना केलेला हट्ट, त्याचे लेकुरवाळे वर्णन करणाऱ्या संतरचना ऐकून रसिकांनी भक्तीरसाची अनुभूती घेतली. निमित्त होते ‌‘विठू माऊली माझी‌’ या कार्यक्रमाचे! शरद क्रीडा … Read more

पुरंदरच्या जनतेचा कल स्वराज्याकडे

सुरज घोरपडे यांच्या परिवर्तन मोहिमेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुरंदर-हवेली मतदारसंघातील जनतेने यंदा परिवर्तनाची दिशा स्पष्ट केली आहे. अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेली विकासकामे, प्रलंबित पाण्याच्या समस्या आणि तरुणांच्या कौशल्यांना मिळणाऱ्या मर्यादित संधींवर जनतेची नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरज राजेंद्र घोरपडे यांनी जनतेशी संवाद साधत गावोगावी … Read more

हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली जेरबंद

पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील ९ गुन्हे उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानातील सेल्समनची नजर चुकवून हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या बंटी आणि बबलीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्या विरोधात पुणे, मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे येथील एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक केलेल्यांची नावे शेखर हेमराज वानी (वय … Read more

प्रतिबंधित ‘रेड्डी आन्ना’ बेटिंग वेबपोर्टलद्वारे ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या १० जणांना अटक

साडेसात लाखांचे साहित्य, बनावट बँक खाते, सिम कार्ड आणि आधार कार्ड जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ‘रेड्डी आन्ना’ नावाच्या बंदी घातलेल्या बेटिंग वेबपोर्टलद्वारे विनापरवाना ऑनलाइन जुगार खेळवताना पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ४८ हजार १०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदेश शिवराम जाधव यांनी रावेत पोलीस … Read more

गंगाधर बधे यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. मतदारसंघातील दिग्गज, निष्ठावान शिवसैनिक व माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या रूपाने सांगली पॅटर्न राबवण्याचा निर्धार केला आहे व बधे यांना निवडून आणण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेत स्थानिक नागरिकांनी जागोजागी उमेदवार गंगाधर … Read more

कोथरूड मतदारसंघात मतदारांना व्होटर स्लिप वाटपाचे काम सुरू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 4,40,555 मतदार असून, येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, कोथरूड मतदारसंघातील 387 केंद्रांवरच्या सुमारे 4.40 लाख मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राबाबत तपशीलवार माहिती देणाऱ्या वोटर स्लिप्सचे वाटप बीएलओंच्या मार्फत घरोघरी सुरू आहे. कोथरूड मतदारसंघाचा बहुसंख्य भाग शहरी असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना वोटर स्लिप … Read more

पती पत्नीच्या भांडणात माहेरच्या लोकांची एन्ट्री

जावयाला मारहाण करून पत्नी, मुलास गेले घेऊन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पतीपत्नीच्या भांडणात इतरांनी नाक खुपसु नये, असे म्हणतात. मुलीच्या संसारात तिचे माहेरचे जरुरीपेक्षा अधिक लक्ष घालू लागले की भांडणे ही होणारच, असे म्हटले जाते़ त्याचा प्रत्यय धनकवडीतील संभाजीनगरमध्ये आला़ पतीपत्नीच्या भांडणात माहेरकडील मंडळीने मुलीच्या सासरी येऊन जावयाला बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार … Read more

प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. यांच्या दीक्षा दिनानिमित्त आळंदी संघाच्या वतीने आदर की चादर प्रदान

महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने महर्षि आनंद सेवा पुरस्कार वितरण संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता आळंदी : प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. यांना दीक्षा दिनानिमित्त आळंदी संघाच्या वतीने आदर की चादर प्रदान करण्यात आली. यावेळी महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने, जैन श्रावक संघाच्या सहयोगाने, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दरवर्षी महर्षि आनंद सेवा … Read more

दारु पिणार्‍याला उपदेश करणे पडले महागात

तरुणाला दोघांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारु पित असलेल्याला कधी सल्ला देऊ नये. त्यात त्याच्या नाकर्तेपणाबाबत तुम्ही काही म्हटले तर तुमची काही खैर नाही. असाच प्रकार समोर आला आहे. ‘अच्छा खाना नही दे सकते हो, तो शादी क्यु बनाया,’ असे म्हटल्याने दारुच्या नशेत दोघांनी तरुणाच्या तोंडातून रक्त … Read more