आवृत्ती , पुणे

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने कात्रज येथील एका तरुणाची १२ लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने ऑनलाइन माध्यमातून फिर्यादींशी संपर्क साधला आणि शेअर ट्रेडिंगबाबत माहिती देऊन त्यात नफा … Read more

शेअर गुंतवणुकीतून महिलेची सहा लाखांची फसवणूक

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: इन्व्हेस्ट केलेल्या रकमेवर अधिक परतावा मिळेल, असा विश्वास दाखवून शेअर गुंतवणुकीस भाग पाडून एका महिलेची साडेसहा लाखांची फसवणूक करण्याची घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून ते १९ जुलै दरम्यान हा प्रकार घडला आहे. … Read more

हांडेवाडीयेथील चार वाहने आगीत खाक

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हांडेवाडी येथील नॅशनल स्क्रॅप सेंटर दुकानासमोर पार्क केलेल्या दोन गाड्यांना कोणीतरी पेटवून दिल्याने सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किस्टोन कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेवाळवाडी फाटा, हांडेवाडी येथे ही घटना घडली … Read more

फोम मिक्सर मशीनमध्ये काम करताना एक ठार, एक जखमी

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फोम मिक्सर मशीनमध्ये साफसफाईचे काम करताना अचानक मशीन सुरू झाल्याने एक कामगार ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास वडकीनाला येथील स्नुज हब कम्फर्ट अॅण्ड स्लिप रेडीफाईन्ड या कंपनीत हा अपघात झाला. या प्रकरणी कैलाश … Read more

गणेशोत्सवात गणेश मंडळांचा होणार पोलिसांकडून सन्मान

सोलापूर जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : ज्या गावांमध्ये “एक गाव, एक गणपती” संकल्पना राबवली जाईल, अशा सोलापूर जिल्ह्यातील गावांना जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत प्रशस्तिपत्र देण्यात येईल. तसेच, पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रथम तीन उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. श्री गणेशोत्सव २०२४ अनुषंगाने जिल्हाधिकारी … Read more

गौस भाई शेख यांना महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : एन टीव्ही न्यूज मराठीचे पत्रकार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गौस भाई शेख यांना एन टीव्ही न्यूज मराठीचा दिला जाणारा महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार अहमदनगर महाराष्ट्र राज्य डिजीटल मिडियाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एन टी व्ही मराठी चे संपादक एकबाल शेख … Read more

महावीरांचे शब्द सर्वजीवकल्याणासाठीच : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन पुणे : “महावीरांचे शब्द सर्वजीवकल्याणासाठीच आहेत आणि सर्वजीवकल्याणामध्येच आपले कल्याण सामावले आहे,” असे प्रतिपादन पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनमालेत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले. पद्मश्री प. पु. आचार्य श्री … Read more

भरधाव डंपरच्या धडकेने दोन जन ठार

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव डंपरच्या धडकेने दोन जण ठार झाल्याची घटना थेऊर गावाच्या हद्दीत गणेशवाडी येथील एच पी पेट्रोल पंपाजवळ (ता. हवेली, जि. पुणे) घडली आहे. हा अपघात १ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत पवार (वय ३१ वर्षे, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. … Read more

महाराष्ट्र जैन वार्ता चा महावीर प्रतिष्ठान येथे सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यामध्ये मागील 9 वर्षापासून जैन समाजातील सर्व बातम्या, समस्या, साधू संताचे विचार प्रखरपणे मांडल्यामुळे महावीर प्रतिष्ठान येथे प.पू. गौतममुनीजी म. सा. यांच्या सानिध्यात सकल जैन समाजाच्या वतीने महाराष्ट्र जैन वार्ता चे संपादक अभिजीत डुंगरवाल, संकेत डुंगरवाल यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र जैन वर्ताच्या संवत्सरी विशेष अंकाचे विमोचन पोलीस उपायुक्त … Read more

नवीपेठ परिसरात चंदनाचे झाड कापून चोरी

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवी पेठ परिसरातील प्रशांतनगर येथील एका सोसायटीमधील बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून चोरी करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३१ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. आसरा बंगल्यातील प्रशांतनगर, एलआयसी कॉलनी, एलबीएस रोड, नवी पेठ येथे फिर्यादी यांच्या घराच्या अंगणातील चंदनाचे झाड, ज्याची किंमत … Read more