आवृत्ती पुणे

डोक्यात कोयत्याने वार करून युवकाचा खून

उत्तमनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरासमोर राहणाऱ्या युवकाने २२ वर्षीय युवकाला, पोते उचलायचे आहे, असे सांगून घराबाहेर नेले. त्यानंतर युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर येथील जुनी मासे आळी येथे रविवारी … Read more

कोंढवा पोलिसांनी मुद्देमाल केला परत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला, मात्र तपासानंतर जप्त केलेला २,५३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादींना परत केला आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, रा. गल्ली नं. २, टिळेकर नगर, कोंढवा, पुणे यांच्या राहत्या घरामध्ये झालेल्या घरफोडीमध्ये २०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. तसेच, … Read more

प्रसन्न जीवन हेच सर्वश्रेष्ठ दान : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त विचारांचे अमृत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सर्वात सर्वश्रेष्ठ दान जर कुठले असेल तर प्रसन्न जीवन हेच सर्वश्रेष्ठ दान आहे प्रतिपादन पद्मश्री प.पु.आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही यावेळी … Read more

महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आदिनाथ जैन स्थानकात प. पु. प्रकाशमुनीजी म.सा. यांच्या सानिध्यात महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी आदिनाथ जैन श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

“पहाट” गुन्हेगारीच्या अंधारातून पारधी समाजाला बाहेर काढणार

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अभिनव उपक्रमाची सुरूवात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणातील आरोपी हे पारधी समाजातील असल्याचे लक्षात आल्या नंतर या समाजातील लोकांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी “पहाट” हा अभिनव उपक्रमाची सुरूवात केली आहे. सदर उपक्रमाची सुरूवात ०६ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण … Read more

नॅकच्या अ श्रेयांकामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर: कृष्णकुमार गोयल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन दिनांक ३० व ३१ ऑगस्ट रोजी पार पडले. या मूल्यांकन प्रक्रियेचा निकाल नुकताच नॅककडून जाहीर करण्यात आला. नॅकच्या अ श्रेयांकामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडल्याचे कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले. गोयल म्हणाले की मागील पाच वर्षांत महाविद्यालयाने अभ्यास, अभ्यासेत्तर व इतर अभ्यासपूरक उपक्रमांत राष्ट्रीय … Read more

जुन्या आठवणीत रमले जेष्ठ विद्यार्थी

महाराष्ट्र विद्यालयातील १९८० सालच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९८० साली इयत्ता १० वी ड च्या वर्गात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संत तुकाराम सभागृहात उत्साही वातावरणात संपन्न झाला. या स्नेह मेळाव्यात माजी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कालखंडातील … Read more

यश मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो : अतुल कुलकर्णी

मूकबधीर विद्यालयात शिक्षक दिन साजरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : यश मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. आपले ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी लागते. त्यासाठी उच्च पातळीचे परिश्रम व प्रयत्न करण्याचा सल्ला, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला. “शिक्षक दिना” निमित्त अतुल कुलकर्णी रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालय, सोलापूर येथे प्रमुख … Read more

जर्मनीतील नोकऱ्यांबाबत आरटीओत मार्गदर्शन शिबीर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : जर्मनीत विविध नोकरी संधी उपलब्ध आहेत, त्याबाबत शासन पुढाकार घेत आहे. या बाबतची माहिती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनामार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे जर्मनीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील … Read more

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेत शिक्षक दिन साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ विद्यालयात गुरुवारी शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणेचे माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावल आणि व्यवस्थापन विकास व संशोधन संस्था (IMDR) च्या संचालक डॉ. शिखा जैन यांचा सन्मान करण्यात आला.