आवृत्ती , पुणे

पुणे ग्रामीणमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास बंदी

परवानगीशिवाय ड्रोन वापरल्यास दंडनीय कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) किंवा छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना संबंधित पोलीस ठाण्याला किमान ७ दिवस आधी पूर्वसूचना देऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक … Read more

भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश

घरमालकांना भाडेकरूंच्या संपूर्ण माहितीची नोंद बंधनकारक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना त्यांच्या संपूर्ण माहितीची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असल्याने तेथे काम करणाऱ्या लोकांना घरे भाड्याने दिली … Read more

इंडस कैपिटल ने दी “बॉल-अ-थॉन 2.0” को स्पॉन्सरशिप

पुणे में खेल और फिटनेस को मिलेगा नया आयाम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो स्पोर्ट्स अपेक्स द्वारा आयोजित “बॉल-अ-थॉन 2.0” को इंडस कैपिटल ने टाइटल स्पॉन्सरशिप प्रदान करने की घोषणा की है। जीतो पुणे चैप्टर के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड, जीतो पुणे चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, इनके मार्गदर्शन में जितो पुणे युथ विंग ये प्रोग्राम … Read more

जिल्ह्यात दुबार असलेली नावे मतदार यादीतून काढणार

मतदार याद्यांमध्ये लवकरच सुधारणा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांच्या मतदार याद्यांमध्ये असलेली दुबार नावे, मयत व्यक्तींची नावे तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे यासंबंधी माहिती घेतली जाईल आणि मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. मतदार याद्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी राजकीय पक्षांच्या जिल्हा … Read more

राज्य बँकेच्या कर्जरोखे वितरणास सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वित्तीय संस्थांकडून ५० कोटींची खरेदी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्जरोखे (बाँड) वितरणास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी, पहिल्याच दिवशी वित्तीय संस्थांकडून ५० कोटी रुपयांच्या रोख्यांची खरेदी करण्यात आली. एकेकाळी तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निकषांचे पालन केल्यामुळे, … Read more

कोंढवा-येवलेवाडी परिसरातील अनधिकृत फलकांवर कारवाई

महापालिकेच्या या उपक्रमाने नागरिक संतुष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा बुद्रुक, शांतिनगर, पार्श्व नगर, गगन उन्नती आणि चोरडिया कॉर्नर या भागातील अनधिकृत फलकांवर कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत परिसरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स व पोस्टर काढून टाकण्यात आले, ज्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण रोखले गेले आणि वाहनचालकांना होणारा त्रासही दूर झाला. ही कारवाई … Read more

फुलांच्या रंगपंचमीने वृद्धाश्रमात आनंदोत्सव

मातृ-पितृ प्रतिष्ठानच्या वतीने रंगपंचमी उत्साहात साजरी पुणे : रंगपंचमीच्या निमित्ताने मातृ-पितृ प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात फुलांची रंगपंचमी साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही आजी-आजोबांनी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत एकमेकांच्या अंगावर फुलांची उधळण करण्यात आली. प्रवीण चोरबेले गेली २० वर्षे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत हा सण … Read more

शिक्षण संस्थाचालकाकडे मागितली २५ लाखांची खंडणी

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी: सिंहगड रोड पोलिसांनी माजी कर्मचाऱ्याला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “तुमचा मुलगा आणि महिला कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आहेत. आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ माझ्याकडे आहेत. हे व्हिडिओ व्हायरल करायचे नसतील तर २५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल,” असे धमकावणाऱ्या शिक्षण संस्थेच्या माजी कर्मचारीला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. … Read more

जादा परताव्याच्या आमिषाने साडेनऊ कोटींला गंडा

इक्विटी ट्रेडचा प्रोफेशनल ट्रेडर कार्यालय बंद करून फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास म्युच्युअल फंडापेक्षा अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून इक्विटी ट्रेडचा प्रोफेशनल ट्रेडर आणि ट्रेनरने तब्बल साडेनऊ कोटी रुपयांना गंडा घातला. त्याने आपले कार्यालय बंद करून फरार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका ५७ वर्षीय नागरिकाने नांदेड सिटी … Read more

मटका किंग नंदकुमार नाईक स्थानबद्ध

तब्बल ६३ गुन्हे दाखल : नागपूरला एक वर्षासाठी जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आतापर्यंत तब्बल ६३ गुन्हे दाखल असलेल्या मटका किंग नंदकुमार नाईक याच्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७२, रा. शुक्रवार पेठ) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. नंदकुमार … Read more