आवृत्ती पुणे

गुन्हा करण्यासाठी कोयते घेऊन आलेले टोळके पोलिसांना पाहून गेले पळून

चुडामण तालीम चौकातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोयते घेऊन दोन दुचाकीवरून पाच जण कोणाचा तरी “गेम” करण्यासाठी जात होते. मात्र, वाटेत पोलिसांना पाहून त्यांची तंतरली आणि त्यांनी गाड्या तेथेच टाकून पळ काढला. ही घटना भवानी पेठेतील चुडामण तालीम चौकातील इनामदार हॉस्पिटलच्या समोर शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. या संदर्भात पोलीस अंमलदार निखील चंदनशिवे … Read more

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचे टायर, हेडलॅम्प चोरीस

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील घटना : वाहनांच्या काचाही फोडल्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चतु:श्रृंगी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांत जप्त केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून, १ लाख १० हजार रुपयांचे टायर आणि हेड/टेल लॅम्प चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे मुद्देमाल कारकून, सहायक फौजदार सूर्यकांत इनामदार यांनी फिर्याद दिली आहे. हा … Read more

दिलीप ढेरे यांच्या तत्परतेने अपघातग्रस्त तरुणाचा जीव वाचला

धाडसी आणि जबाबदार कृतीचे सर्वत्र कौतुक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, स.पो.नि. दिलीप विष्णू ढेरे यांच्या तत्परतेने आणि धाडसपूर्ण कृतीने एका अपघातग्रस्त तरुणाचा जीव वाचला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि सेवाभावाचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. दिनांक ३ डिसेंबर रोजी रात्री एक वाजता … Read more

दारुच्या नशेत तरुणाला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण

कोथरुडमधील घटनेत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारु पिल्यानंतर किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीत तिघांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटची वीट घालून बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. कर्वेनगरमधील चांदणी बार ते कोथरुडमधील कोकण एक्सप्रेस दरम्यान घडलेल्या या घटनेत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना … Read more

जितो पिंपरी चिंचवड चँप्टर चा शपथ ग्रहण सोहळा संपन्न

जितो पिंपरी चिंचवड च्या अध्यक्ष पदी आनंद मुथा तर उपाध्यक्ष पदी तुषार लुणावत यांची निवड महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जितो पिंपरी चिंचवड चा शपथ ग्रहण सोहळा चिंचवड येथील एल- प्रो मॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जितो पिंपरी चिंचवड चँप्टरच्या अध्यक्षपदी:आनंद मुथा, उपाध्यक्षपदी: प्रकाश गादीया, दिलीप सोनिग्रा, मुख्य सचिव: तुषार लुणावत, सचिव: अभिषेक जैन, … Read more

“सन्मान कर्तृत्वाचा” – नवचैतन्य संस्थेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न

“देणे समाजाचे, जगणे आनंदाचे” विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान आणि पुरस्कार वितरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त “देणे समाजाचे, जगणे आनंदाचे” या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान आणि समाज भूषण व समाज दूत पुरस्कार सोहळा दीपस्तंभ फाउंडेशनच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राने झाली. उद्घाटन सुनील चोरडिया (संस्थापक, हॅंडीकॅप सेंटर, … Read more

पत्नी माहेरी आल्याने जावयाने सासुच्या घराला लावली आग

कोथरुडमधील सुतारदरा येथील घटनेत संसारोपयोगी साहित्य जळून खाक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दोघा पतीपत्नीत भांडणे झाल्याने सासुने सुनेला माहेरी पाठविले. पत्नी माहेरी आल्याचा राग आल्याने जावयाने पाच मिनिटामध्ये घरी नाही आलीस तर तुझ्या आईचे घर जाळून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने खरोखरच आपल्या सासरच्या घराला आग लावून दिली. त्यात घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य … Read more

सरकार झाले स्थापन, आता मंत्रीपदाकडे लक्ष

पुण्याला मिळणार महत्वाचे स्थान : चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे, राहुल कुल यांना संधी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरुन मते देऊन विक्रमी जागांसह विजयी केले. त्यामुळे आता महायुती तातडीने सत्तेवर येईल, असे लोकांना वाटत होते. परंतु, प्रत्यक्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेण्यासाठी १३ दिवस वाट पहावी लागली. त्यातही … Read more

बनावट कपडे विक्री करणार्‍या दुकानातून ३५ लाखांचा माल जप्त

कोरेगाव पार्कमध्ये दोन दुकानांवर कारवाई : तिघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ब्रॉन्डेड कंपनींचे बनावट कपडे विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी छापा घालून ३५ लाख ३१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन दुकानातील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश विष्णु कांबळे (वय ४२, रा. जनवाडी) यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद … Read more

वेश्या व्यवसाय करणार्‍या स्पामालकाला अटक

धानोरीतील गुडविल स्क्वेअर मॉलमधील स्पामधून दोन महिलांची सुटका पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या अरमोनिया फॅमिली स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून दोन पिडित महिलांची सुटका केली. तेथील स्पा मॅनेजर व मालकाला अटक केली आहे. सुरज भरत शाहू (रा. वाशी, ठाणे, सध्या रा. पुणे) असे स्पा मॅनेजर व मालकाचे नाव आहे. याबाबत अनैतिक मानवी … Read more