आवृत्ती , पुणे

सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्यावतीने महिलांवरील अन्यायाविरोधात शांतता मोर्चा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचार असो की, बदलापूर येथील चिमुकलीवरील अन्याय असो, महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी, महिलांवरील अन्यायाविरोधात जागृती करण्यासाठी सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या (एसएलसी) वतीने बावधन परिसरात शांतता मोर्चा काढण्यात आला. सुर्यदत्त विधी महाविद्यालयापासून एनडीए रोडपर्यंत आणि पुन्हा बवधनमध्ये बॅनर आणि पोस्टर्स हातात घेऊन … Read more

पत्नीने चाकूने वार करून केला पतीचा खून

सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून पत्नीने रागाच्या भरात पतीचा चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना मानाजीनगर, न-हे येथे घडली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९ : १५ च्या सुमारास घरगुती वादातून पती-पत्नीचे भांडण झाले. त्यात रागाच्या भरात … Read more

सत्वंसरी महापर्व बिबवेवाडी जैन स्थानकमध्ये साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बिबवेवाडी जैन स्थानकात सत्वंसरी महापर्व उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी “क्षमा वीरस्य भूषणम्” हा संदेश देत प. पू. महासती श्री. सुप्रियदर्शनाजी म. सा. यांनी क्षमेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, क्षमा करणे हे वीरांचे लक्षण आहे, आणि क्षमा मागणे किंवा देणे हे बलशाली मनाचे कार्य असते. प्रत्येकाने … Read more

प्रसन्न जीवन हेच सर्वश्रेष्ठ दान : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त विचारांचे अमृत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सर्वात सर्वश्रेष्ठ दान जर कुठले असेल तर प्रसन्न जीवन हेच सर्वश्रेष्ठ दान आहे प्रतिपादन पद्मश्री प.पु.आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही यावेळी … Read more

महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आदिनाथ जैन स्थानकात प. पु. प्रकाशमुनीजी म.सा. यांच्या सानिध्यात महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी आदिनाथ जैन श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बिबवेवाडी जैन स्थानकात चातुर्मासाच्या सहयोगी आणि दानशूर व्यक्तींचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता बिबवेवाडी जैन स्थानकात चातुर्मासाच्या सहयोगी आणि दानशूर व्यक्तींचा सन्मान सोहळा मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला. केंद्रीय सहकार आणि उड्डाण राज्य मंत्री, मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते मानचिन्ह देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. बिबवेवाडी जैन स्थानक, पुणे येथे महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पु. डॉ. श्री. ज्ञानप्रभाजी म.सा. यांच्या सुशिष्या तपस्वी रत्न … Read more

ज्याला अंतरज्ञान तो सर्वात सुखी : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त बरसल्या विचारधारा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ज्याच्याकडे परिग्रहाच्या दृष्टीने बघितले, सत्तेच्या दृष्टीने बघितले, साधनेच्या दृष्टिकोनातून बघितले तरी जगात सर्वात सुखी कोण आहे? मला विचाराल तर परमात्म्याचा आपल्याला जबरदस्त आधार आहे आणि सर्वात सुखी अंतरज्ञानीच आहे असे प्रतिपादन पद्मश्री प.पु.आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन … Read more

महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बिबवेवाडी जैन स्थांनकात प. पु. सुप्रीयदर्शनाजी म. सा. यांच्या सानिध्यात महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, पोपटलाल ओसवाल, प्रवीण चोरबेले, रवींद्र दुगड, अनिल भन्साळी, सतीश मुथा, चंद्रकांत लुंकड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद दुगड, माणिक दुगड, बाळासाहेब कोयालीकर, सुनील नाहर, बाळासाहेब ओसवाल, पन्नालाल … Read more

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेत शिक्षक दिन साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ विद्यालयात गुरुवारी शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणेचे माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावल आणि व्यवस्थापन विकास व संशोधन संस्था (IMDR) च्या संचालक डॉ. शिखा जैन यांचा सन्मान करण्यात आला.

दानात समर्पणाची भावना महत्वाची : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त बहुमोल विचारधन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपण जेव्हा देवाला प्रणाम करतो तेव्हा समर्पणाची भावना आपण तोलत नाही. आपल्याकडे जेवढं आहे तेवढं आपण देवाला समर्पित करतो हातचं काही राखून ठेवत नाही आपल्याकडे जे काही आहे ते आपण देवाला समर्पित करतो म्हणूनच देवाला दिलेल्या दानात समर्पणाची भावना महत्त्वाची आहे असे प्रतिपादन पद्मश्री … Read more