आवृत्ती , पुणे

चंदनाची लाकडे चोरून नेताना सराईत चोरटा जाळ्यात

एक लाख रुपयांची चंदनाची लाकडे, हत्यारे पकडली: सिंहगड रोडवरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चंदन तस्कर रात्री-अपरात्री टोळक्यांसह येऊन चंदनाची झाडे चोरून नेतात. त्यात मधे कोणी आले, तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. पुणे शहरात अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. धायरी परिसरातील चंदनाचे झाड तोडून त्याची लाकडे घेऊन जाणाऱ्या सराईत चोरट्याला सिंहगड … Read more

अट्टल गुन्हेगाराकडून दोन पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी, तडीपार असतानाही शहरात मुक्काम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तडीपार असतानाही शहरात येऊन राहणार्‍या आणि पिस्तुल बाळगणार्‍या अट्टल गुन्हेगाराकडून सिंहगड रोड पोलिसांनी दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. बाळू धोंडिबा ढेबे (वय २७, रा. राम मंदिराजवळ, जनता वसाहत) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. बाळू ढेबे हा सराईत … Read more

इलेक्ट्रिक बाईकबरोबर फोटो काढून घेऊन बाईक दिल्याचे भासविले

परस्पर कर्ज घेऊन केली फसवणूक : शुष्को युनिकॉर्नच्या चालकांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इलेक्ट्रिक बाईकसाठी कर्ज मंजूर करून बाईक देतो, असे सांगून त्या बाईकबरोबर फोटो काढून घेतले. त्यानंतर ते फोटो फायनान्स कंपनीला पाठवून ग्राहकांना गाड्या दिल्याचे भासवून त्यांच्या कर्जाचा अपहार केला. शुष्को युनिकॉर्न प्रा. लि. च्या चालकांनी ५ लाख ५६ हजार रुपयांची … Read more

2025 मध्ये या दिवशी बार्शी शहरात होणार नाही मांस विक्री

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने वर्ष २०२५ साठी नगरपरिषदेच्या क्षेत्रातील कत्तलखाने आणि मांस विक्रीसाठी काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. यानुसार, २०२५ सालातील विशिष्ट दिवसांवर जनावरांची कत्तल व मांस विक्री पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगरपरिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार खालील १७ दिवसांवर बंदी राह 1. प्रजासत्ताक दिन – … Read more

मेट्रोच्या जागेतील ५० झोपड्या महापालिकेने हटविल्या

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर दिवाणी न्यायालय (सिव्हिल कोर्ट) मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या डेंगळे पुलाजवळ उभारण्यात आलेल्या ५० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. मेट्रोच्या जागेत या बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी पुणे मेट्रोच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती. शहरातील रस्त्यांवर वाढत असलेले अतिक्रमण, बेकायदा फेरीवाले तसेच अनधिकृत बांधकामे यावर कारवाई करण्याबाबत चर्चा … Read more

पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून

चारित्र्याचा संशय, सिंहगड रोडवरील नर्‍हे येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.रेश्मा भिकु खुडे (वय ३२, रा. कुटे मळा, मानाजीनगर, नर्‍हे, मुळ रा. वडुज, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, … Read more

मेफेड्रॉन अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

१५.७७ लाखांचा माल जप्त: लष्कर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १५ लाख ७७ हजार रुपयांचा ७७ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. हुसेन नुर खान (वय २१, रा. नवाझीस पार्क, संपन … Read more

स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोर ताब्यात

बनावट कागदपत्रांसह १० वर्षे बेकायदा वास्तव्य; पोलिसांकडून सापळा रचून अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे, ता. १७: स्वारगेट परिसरातील महर्षीनगर भागात दहा वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. एहसान हाफीज शेख (वय ३४, सध्या रा. महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ रा. बांगलादेश) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅन … Read more

पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे वेध; निधी वर्गीकरणावरून राजकीय हालचालींना वेग

प्रभागनिहाय निधीची पळवापळवी; १२.६० कोटींच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मंजुरी पुणे: आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभागनिहाय निधी वर्गीकरणावरून गडबड सुरू झाली आहे. पदाधिकारी तयारीला लागले असताना महायुतीच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये निधी वळविण्याचे प्रकार अधिक दिसून येत आहेत. स्थायी समितीच्या आज (ता. १७) झालेल्या बैठकीत तब्बल १२.६० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी … Read more

योगिता भोसले ठरल्या पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव

पुणे महापालिकेत पहिली महिला नगरसचिव म्हणून रचला इतिहास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: पुणे महापालिकेच्या नगरसचिवपदी योगिता भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी त्या प्रभारी नगरसचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या नियुक्तीमुळे तब्बल चार वर्षांनंतर पुणे महापालिकेला स्थायी नगरसचिव मिळाला आहे. महापालिकेच्या नगरसचिवपदावरून सुनील पारखी हे २०२० … Read more