आवृत्ती , पुणे

पॅनकार्ड अपडेट करण्याचा ई-मेल आला का ?

सावधान ! तो सायबर चोरट्यांचा असू शकतो महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारने नुकतीच क्विक रिस्पॉन्स कोड म्हणजेच क्यू आर कोड असलेल्या पॅन कार्ड २.० ची घोषणा केली आहे. हे आपल्याला माहितीच असेल. या पॅन कार्डमध्ये मॅट्रिक्स बारकोड असणार आहे. त्यामुळे या पॅन कार्डचा वापर अधिक सुरक्षित होणार आहे. बनावट पॅन कार्ड बनविणे चोरट्यांना … Read more

सुलाखे हायस्कुलचे प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांना जीवन गौरव पुरस्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी: सुलाखे हायस्कुलचे प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने त्यांना पहिला “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान केला. शैक्षणिक, संख्यात्मक आणि भौतिक प्रगतीत अल्प कालावधीत केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्राचार्य … Read more

बिल्डरला ४ कोटींचा गंडा घालणारी सायबर चोरटी जाळ्यात

दुबईला गेलेल्या अध्यक्षांच्या नावाने फसवणूक; सायबर पोलिसांची १० महिन्यांनंतर यशस्वी कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या अध्यक्षांच्या नावाने टेक्स्ट मेसेज पाठवून तब्बल ४ कोटी ६ लाख १७ हजार ३१६ रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरटीला सायबर पोलिसांनी तब्बल १० महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अटक केली. सानिया ऊर्फ गुड्डीया मोहम्मद मुस्तकीम साहब सिद्दीकी (वय … Read more

गळ्यातील चोरतात, दागिने बॅगेत ठेवले तर बॅग च चोरली

बोपखेल फाट्यावर चोरट्यांचा थरार : ४ लाखांचा ऐवज लंपास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लग्नात दागिने घालून मिरविले. त्यानंतर रात्री घरी जाताना चोरटे गळ्यातील दागिने हिसकावितात, म्हणून त्यांनी गळ्यातील मोहनमाळ, मंगळसुत्र काढून कापडी पिशवीत ठेवले. पतीबरोबर दुचाकीवरुन जात असताना चोरट्यांनी त्यांना एकटे गाठून पिशवी हिसकाविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिकार केला. तेव्हा चोरट्याने त्यांना खाली … Read more

सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

कोंढव्यातील घटना, अडीच महिन्यांनंतर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सावत्र वडिलांकडून होत असलेल्या मारहाणी आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यांनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संदीप ऊर्फ शब्बीर इब्राहिम शेख (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव … Read more

पीन नंबर टाकला अन खात्यातून गेले १३ लाख

मुदत ठेवीवरही ओव्हरड्राफ्ट करुन काढली रक्कम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ नागरिकाला बँकेचे केवायसी करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून त्यावर डेबिट कार्डचा पिन टाकायला सांगितला. त्यांनी पिन नंबर टाकल्याबरोबर काही मिनिटात ४९ व्यवहार करुन त्यांच्या खात्यावरुन तब्बल १३ लाख ३२ हजार ५९६ रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करुन फसवणूक करण्यात आली. याबाबत मयूर कॉलनीत राहणार्या ६९ … Read more

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये मारामारी

दोघांनी एका कैद्याला मारहाण करुन केले जखमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चेष्टा मस्करी करताना झालेल्या वादातून दोघा कैद्यांनी खुनाचा आरोपाखालील कैद्याला बेदम मारहाण केली. कैद्याच्या बरगडी व नाकावर ठोसा मारल्याने तो जखमी झाला आहे. सुधीर गौतम थोरात असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत तुरुंगाधिकारी कारागृह रक्षक विश्वास नरहरी वाकडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात … Read more

तडीपार गुंडासह दोन साथीदारांना अटक

रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना मारहाण करून लुटणाऱ्या तडीपार गुंडाला त्याच्या दोन साथीदारांसह लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरीला गेलेल्या दोन मोटारसायकली व मोबाईलसह ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. छोट्या ऊर्फ अभिषेक शिवाजी आल्टे (वय २३, रा. बाबाजान चौक, … Read more

पुणे जिल्हा लोक अदालतमध्ये राज्यात पुन्हा अव्वल

366 कोटी तडजोड रक्कम जमा 87 हजार 486 प्रकरणे निकाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे, 16 डिसेंबर:- शनिवारी (14 डिसेंबर) रोजी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील ४थ्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. लोकअदालतमध्ये दाखल करण्यात आलेल्या एकूण प्रकारणांपैकी सुमारे 87 हजार 486 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर 366 कोटीहून … Read more

सायबर चोरट्यांनी महिलेला १९ लाखांना गंडा

सोने तारण ठेवून कर्ज काढले : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर गुन्हेगारांनी शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने पाषाण येथील ४१ वर्षीय महिलेला तब्बल १९.६६ लाख रुपयांना फसवले. हुंडाई कंपनीचा आयपीओ (IPO) लागल्याचा बहाणा करत त्यांनी महिलेकडून सोने तारण ठेवून कर्ज घेत पैसे जमा करायला लावले. मात्र, ना त्यांना हुंडाईचे शेअर्स मिळाले, ना … Read more