आवृत्ती पुणे

भरधाव कारने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वार ठार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भरधाव कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार गतिरोधकावरून (स्पीड ब्रेकर) उडून रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी रस्त्यावरील आर्मी पब्लिक स्कूल समोर शुक्रवारी पहाटे अडीच वाजता हा अपघात घडला. स्वप्नील प्रदीप खरबडे (वय २६, रा. गजानन … Read more

वाघोलीत फ्लॅट खरेदीत 40 लाखांची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅटचा रीतसर व्यवहार करुन 40 लाख रुपये घेतले. मात्र, फ्लॅट विक्रीपूर्वी तो फ्लॅट बँकेत तारण ठेवून कर्ज घेतल्याची माहिती न देता आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार वाघोली येथील आर.पी.एस. हेरिटेज या गृहप्रकल्पामध्ये 14 नोव्हेंबर 2018 ते 26 जून 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस … Read more

कॅम्प परिसरातील शिवमंदीरात चोरी, तीन चोरट्यांना अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एन.डी.ए खडकवासला मिलेट्री कॅम्प येथील शिवमंदिरात चोरी करणाऱ्या तिघांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.26) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. चोरट्यांनी मंदिरातील तांब्याचा कलश व पितळी नाग चोरून नेला होता. याबाबत भास्कर दिनेशचंद सुयाल (वय-27 रा. सरस्वती नगर, शिंदे पार्क जवळ, उत्तमनगर) यांनी गुरुवारी (दि.27) उत्तमनगर … Read more

पुण्यात 14 वर्षाच्या मुलाने चालवला टँकर, 4 जणांना चिरडले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी येत असताना पोर्शे कार अपघातानंतर शनिवारी आता वानवडी परिसरात आणखी एक भीषण अपघात झाला आहे. एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने वेगाने टँकर चालवत अनेकांना उडवले. या अपघातात सकाळी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच एका दुचाकी चालक महिलेला धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. त्यामुळे … Read more

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी आहे तरी काय ?

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्याचे अर्थमंत्री आणि पुणे जिल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामध्ये त्यांनी पुणे जिल्ह्यासाठी खास लक्ष्य दिल्याचे दिसत आहे. १) पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मेट्रोसाठी विशेष तरतूद केली आहे. मेट्रो मार्गांची लांबी वाढविण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. २) पुण्यातील … Read more

प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर वाहतुकीस बंद

पालखी सोहळ्यामुळे निमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पांढरीकडे प्रस्थान झाले असून दोन्ही सोहळ्यांचे रविवारी (दि.३०) शहरात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. पालखी आगमनानिमित्त रविवारी दुपारनंतर शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. पालख्यांच्या आगमनानिमित्त … Read more

पिंपरी-चिंचवड शहरात चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी चिंचवड येथे वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 5 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. दिपक भगवान जाधव (वय-26 रा. कुशल सोनाली सोसायटी समोर, चाकण मुळ रा. मु.पो. पाथरी ता.जि. जळगाव), … Read more

महिला, शेतकरी, युवक यांच्यासाठी भरीव तरतुद असणारा अर्थसंकल्प : ललित गांधी

प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे पाठपुरावा करणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा पायाभुत सुविधा विकासावर भर देणारा आहे. विशेषतःमहिला, युवक व शेतकरी यांच्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या असुन लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातुन बाजारात पैसा येईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी … Read more

घरकाम देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या महिलेसह दोघाना अटक

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : दोन लाखाचे दागिने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरकाम करणाऱ्या महिलांना काम देण्याचे बहाण्याने चहा मधून गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार महिलेस व तिच्या साथीदारास बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १२ जून रोजी दुपारी १२.३० वा ते रात्री १०.३० वा च्या दरम्यान एका अनोळखी महिलेने … Read more

टास्कसाठी गुंतवणूक करणे पडले २३ लाखाला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अनोळखी मोबाईल धारकाने टास्कसाठी गुंतवणूक करण्यास भाग पाडून २३ लाखाची फसवणुक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेने (वय २९ वर्षे रा. साईनाथनगर वडगाव शेरी, पुणे) चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अनोळखी मोबाईल धारकाने फिर्यादी यांना व्हॉट्सअप द्वारे व त्यानंतर टेलिग्रामद्वारे टास्क साठी गुंतवणूक करणे आहे, … Read more