आवृत्ती पुणे

बार्शीतील मुलांची सुवर्ण पदकावर मोहोर!

नॅशनल फेडरेशन रोलर म्युझिकल चेअर चॅम्पियनशीप स्पर्धेत यश महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : द म्युझिकल चेअर अँड स्केटिंग स्पोर्ट्स असोसिएशन गुजरात द्वारा आयोजित नॅशनल फेडरेशन रोलर म्युझिकल चेअर चॅम्पियनशिप – २०२४ मध्ये बार्शीतील मुलांनी मोठे यश संपादन केले. या स्पर्धेत मुलांनी सुवर्ण पदकासह पदकांची लयलूट केली. या स्पर्धा अहमदाबाद येथे पार पडल्या. … Read more

आई वडील हेच आपले दैवत – कृष्णकुमार गोयल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : माणूस म्हणून घडत असताना संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात. संस्कारांनी मनुष्य समृद्ध होतो. त्याला जगण्याची दिशा मिळते. संस्कारांचं हे विद्यापीठ आपल्या आई-वडिलांच्या रुपाने प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. त्यामुळे आई वडील हेच आपले दैवत आहेत असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले. खडकी शिक्षण संस्थेच्या … Read more

एच. व्ही. देसाई महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री पूना गुजराती बंधू समाज, दि पूना गुजराती केळवणी मंडळ व महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ या सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून एच. व्ही. देसाई कॉलेज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे … Read more

निर्दलीय प्रत्याशी के रुप में समाजसेवी गणपत काेठारी का चुनावी दंगल में प्रवेश

लगातार मिलते समर्थन से िबगड़ सकता है वाेटाे का समीकरण, राेमांचक माेड़ पर दक्षिण मुंबई की सीट महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई। लोकसभा चुनाव के दूसरे चरण की वोटिंग भी सम्पन्न हो गई। वही अगले चरण की तैयारियां जोरो साेराें से चल रही है। हालांकि मुंबई में चुनाव 20 मई को होना है। … Read more

१२ वर्षापासुन फरार आरोपीला गुजरातमध्ये अटक

युनिट ५, गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सलग १२ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस बारडोली, गुजरात येथुन अटक करण्यात युनिट ५, गुन्हे शाखेला यश आले आहे. वहीम पटेल, (वय ४५ वर्षे रा. अस्थान जीम कंपाऊंड, मॅजीक ग्लास शॉप ता. बारडोली जि. सुरत राज्य गुजरात व मुळ स.नं. ११०, रामटेकडी, हडपसर, … Read more

जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : देशाच्या विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे. परंपरेने हा समाज आमच्या महायुतीच्या पाठीशी आहे. जैन समाजाच्या विकासासाठी हे सरकार नेहमीच कटिवद्ध राहील. जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्याचा निर्णय सरकार घेईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने … Read more

टार्गेट यूपीएससी’च्या 25 विद्यार्थ्यांचे उज्वल यश

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निकालात, मुंबईस्थित प्रतिष्ठित संस्था ‘टार्गेट यूपीएससी’च्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे.संस्थेचे प्रमुख डॉ. सुदर्शन लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली, एकूण २५ विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या विद्यार्थ्यांनी संस्थेद्वारे आयोजित केलेल्या ऑनलाइन वर्गांचा लाभ घेतला होता. यामध्ये टॉपर्स आयन जैन … Read more

शिबिरांमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास – राहुल सोलापूरकर

खडकी शिक्षण संस्थेतर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : विद्यार्थ्यांनी बालवयातच स्वतःमधील कलागुणांना ओळखून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करायचा असतो. यासाठी ‘स्व’ओळखणे आवश्यक असते. स्वतःचा ‘स्व’ अशा शिबिरांच्या माध्यमातून शोधता येतो आणि या शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो, असे मत सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले. खडकी शिक्षण संस्था … Read more

सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मुंबई उच्च न्यायालयाला भेट

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत प्रात्यक्षिक ज्ञान अवगत करण्याकरिता सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला भेट दिली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य प्रा. डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, डॉ. मोनिका सेहरावत यांच्या नेतृत्वात बीएएलएलबी द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांची भेट आयोजित … Read more

पूना रिव्हरसाइड राऊंड टेबल इंडिया 105 तर्फे ॲम्ब्युलन्ससाठी मदत

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पूना रिव्हरसाइड राऊंड टेबल इंडिया 105 (PRRT105) ने दळवी मेडिकल फाउंडेशनच्या हॉस्पिटलला 8 लाख रुपयांची नवीन ॲम्ब्युलन्स व्हॅन खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले आहे. राउंड टेबल इंडियाच्या H.E.A.L (हेल्थकेअर एन्हांसमेंट फॉर ॲक्टिव्ह लिव्हिंग) नावाच्या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि सुलभता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. … Read more