आवृत्ती , पुणे

सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या नेमणुका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलीस दलातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात असून, त्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आहेत. बदल्यांचे सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे –विठ्ठल दिगंबर दबडे (विशेष शाखा १) यांची बदली खडकी विभागात … Read more

अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला अटक

गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील कसुरीबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि निलंबनाच्या कारवाईत मदत करण्यासाठी तीन लाखांची लाच मागून अडीच लाख रुपये लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संजय महादू गुंजाळ (उपसंचालक, फलोत्पादन-४ आणि प्रभारी सहसंचालक, फलोत्पादन, कृषी आयुक्त … Read more

पुण्यात वाढती गुन्हेगारी: पोलिसांसमोर आव्हान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “पुणे तिथे काय उणे” ही म्हण प्रसिद्ध असली तरी सध्या पुण्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. निसर्गरम्य आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता अल्पवयीन गुन्हेगारांचे माहेरघर बनू लागले आहे. या परिस्थितीकडे सर्व राजकीय नेत्यांनी आणि पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील तरुण पिढी चुकीच्या … Read more

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे, दि. १०: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन येथील झुंबर हॉलमध्ये दुपारी २ ते ४ या वेळेत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महसूल कर्मचारी संघटना, ग्राम महसूल अधिकारी संघटना, कोतवाल संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी नुकसान … Read more

लोकांच्या जीवापेक्षा यांना पैसा ‘प्यारा’

नायलॉन मांजा विक्री करणार्‍या दुकानावर पोलिसांची धाड पुणे : संक्रांतीचा सण जवळ आला की, पतंगबाजीची धामधूम सुरु होते. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन किंवा चिनी मांजा जीविताला गंभीर धोका निर्माण करतो. त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही नायलॉन मांजामुळे गळा कापून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांसाठी काहीजण … Read more

तुम्हाला कोणी “एपीके” फाईल पाठविली आहे

त्यात माहिती भरुन पाठवू नका, ती सायबर चोरट्यांची असू शकते महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या नावाखाली अनोळखी व्यक्ती फोन करून तुमची गोपनीय माहिती घेतात, तुमच्या खात्यांवर हल्ला करतात, आणि लाखो रुपयांची फसवणूक करतात. नागरिकांमध्ये जागरूकता नसल्याने या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ … Read more

मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीग सीजन 4 चे उद्घाटन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय महिला क्रिकेटपटू दिशा कासट आणि पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीग (MFCL) सीजन 4 चे दिमाखदार उद्घाटन झाले. यावेळी मंचावर पुणे मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, दुगड ग्रुपचे रुपेश दुगड, गणेश दाळ आणि बेसन मिलचे सतीश शहा, दी पुणे मर्चंट्स चेंबरचे … Read more

रॅली काढून दहशत माजविणाऱ्या गुंडांची काढली धिंड

युनिट चार व येरवडा पोलिसांची कारवाई : नागरीकांकडुन कौतुक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा तुरुंगातून सुटका झालेल्या मोक्यातील गुंड प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या कसबे याने समर्थकांसह लक्ष्मीनगर भागात रॅली काढून दहशत निर्माण केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत ९ जणांना अटक केली आणि त्यांच्या दहशतीला सडेतोड उत्तर दिले. अटक केलेल्यांची आरोपींची नावे तुषार सुरेश … Read more

धनाप्पा शेटे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : उपळाई बु येथील सुपुत्र आणि बार्शी शहरातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी धनाप्पा शेटे यांची नुकतीच बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे बार्शी तालुक्यात आणि त्यांच्या गावात आनंदाची लाट उसळली असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धनाप्पा शेटे हे शांत, शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष … Read more

बार्शीच्या व्यापाऱ्यास बनावट सोने देऊन १० लाखांची फसवणूक

अनामिक महिला आणि पुरुषावर फसवणुकीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : शहरातील एका व्यापाऱ्यास बनावट सोने देऊन १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अनामिक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील हिरालाल जैन (वय ३८) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचे बार्शीतील तेजस हार्डवेअर आणि … Read more