आवृत्ती , पुणे

टास्कच्या नावाखाली तिघांची २४ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांच्या आमिषाला पडताहेत बळी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेटिंग देण्याचे टास्क देऊन त्यावर किरकोळ परतावा देत विश्वास संपादन करून, त्यानंतर पैसे भरायला लावून दोन महिलांसह तिघांची २४ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे वर्षाच्या अखेरच्या दिवशी समोर आले आहे. घरबसल्या पार्ट-टाईम कामाच्या नावाखाली लोकांना टास्क दिले जातात. सुरुवातीला रेटिंग देण्यास सांगून त्यावर लगेच … Read more

शेतकऱ्याकडून खंडणी मागणाऱ्यास कात्रजमध्ये अटक

खंडणी विरोधी पथकाची प्रभावी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोशी येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांकडे खंडणी मागून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कात्रजमधून अटक केली आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपी अनिकेत भरत उतळे (वय १९, रा. श्रीराम कॉलनी, आदर्शनगर, मोशी) याला व दोघा अल्पवयीन मुलांना भारती विद्यापीठ हॉस्पिटलसमोरील … Read more

रिक्षाचालकाला निर्जन स्थळी नेऊन मारहाण करुन लुबाडले

पुणे स्टेशन येथील वाहनतळावरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसून रिक्षा निर्जन ठिकाणी नेल्यावर चालकाला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने गुगल पेद्वारे पैसे जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विष्णु मुन्ना चव्हाण (वय २०, रा. चाकण) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

रेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षांची बालिका बेवारस अवस्थेत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षाची बालिका बेवारस अवस्थेत सापडली. बालिकेला बेवारस अवस्थेत सोडून पसार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाच्या परिसरात बेवारस अवस्थेत बालिका आढळून आली. बालिका रडत … Read more

नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचीच पतंग कटण्याची वेळ

दुचाकीस्वाराचा चिरला गळा, पक्ष्यांनाही धोका महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नायलॉन किंवा चिनी मांजावर बंदी असतानाही शहरात त्याची सर्रास विक्री सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हा मांजा जखमी करणाऱ्या आणि जीवघेण्या दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहे. दुचाकीस्वारांच्या गळ्यावर मांजा अडकल्याने अपघातांची संख्या वाढत असून, पक्ष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. नागरिकांनी या जीवघेण्या मांजाचा वापर थांबवावा, अशी … Read more

बनावट फर्मद्वारे ४९६ कोटींचा कर चुकविला

जीएसटी कार्यालयाकडून दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बनावट जीएसटी फर्म, बँक खाते, सिमकार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करून तब्बल ४९६ कोटी २७ लाख रुपयांचा कर चुकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीजीजीआय (डायरेक्टरेट जनरल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स … Read more

मोस्ट वॉन्टेड वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण : म्हणाला, “तर शिक्षा भोगायला तयार”

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याने अखेर सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. दोषी असल्यास शिक्षा भोगायला तयार असल्याचे त्याने व्हिडिओद्वारे जाहीर केले. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड अनेक दिवस फरार होता. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवूनही तो सापडत नव्हता. अखेर, आज सकाळी त्याने … Read more

नगर रोडवरील अपघातात रिक्षा प्रवाशाचा मृत्यू

दारूच्या नशेत रॉंग साइडने रिक्षा चालवून कॅबला दिली धडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत रॉंग साइडने रिक्षा चालवून कॅबला धडक दिल्यानंतर रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात रिक्षा प्रवाशाचा मृत्यू झाला. धरमवीर राधेश्याम सिंग (वय ३८, रा. श्रीनगर, वडगाव शेरी) असे मृत्यू पावलेल्या रिक्षा प्रवाशाचे नाव आहे. याबाबत कॅब चालक पराग सुनिल शर्मा (वय २८, … Read more

१ कोटी २० लाखांचा मद्याचा साठा जप्त

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई : ९ जणांना अटक, ५ वाहने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नववर्षाचे स्वागत मद्यपानाने करण्याचा जणू रिवाज पडल्यामुळे या दिवशी मद्यविक्रीत मोठी वाढ होते. या संधीचा फायदा घेत गोवा राज्यात तयार होणाऱ्या मद्याचा तसेच बनावट मद्याचा अवैध वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे लक्षात घेऊन राज्य … Read more

१०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघे चोरटे जेरबंद

मोबाईल चोरट्यांनी तरुणाला नेले होते ३०० मीटर फरफटत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोबाईल चोरत असताना त्याला प्रतिकार केल्याने चोरट्याने तरुणाला ३०० मीटर फरफटत नेऊन चावा घेऊन जखमी केले होते. या चोरट्यांचा शोध घेताना हडपसर पोलिसांनी तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही तपासून चोरट्यांना अटक केली. मंथन त्रिलोक पवार (वय १९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), रोहित … Read more