आवृत्ती पुणे

बनावट चलनी नोटा बाळगणारा आरोपी जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पाचशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा बाळगणारा आरोपी अचानक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सतर्क पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या आदेशाने सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत … Read more

अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवा

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी निर्जन स्थळी पोलीस चौक्या अद्ययावत कराव्यात, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त घालताना सायरनचा वापर करावा, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी … Read more

राज्याला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटींचे कर हस्तांतरण

सणासुदीच्या काळात भांडवली खर्च आणि कल्याणकारी उपक्रमांना चालना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटी रुपये कर हस्तांतरण गुरुवारी (दि. १०) करण्यात आले. या निधीमध्ये आगामी सणासुदीच्या काळात भांडवली खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याचाही समावेश आहे. उर्वरित निधी राज्याच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना १,७८,१७३ कोटी … Read more

कात्रज – कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील कात्रज-कोंढवा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलाला सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान यांनी केलेल्या विनंतीनुसार, पुणे महानगरपालिकेने हा प्रस्ताव दिला होता. या … Read more

बोगस डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खोटे प्रमाणपत्र दाखवून दवाखाना चालवत उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा इसम वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मुळव्याध उपचार केंद्र, श्रीकृष्ण पॅलेस, सय्यदनगर, वारजे माळवाडी … Read more

शहरातील सर्व कामगारांची मोफत नोंदणी व नूतनीकरण अभियान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी भूम शहरातील सर्व कामगारांची मोफत नोंदणी व नूतनीकरण अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत कामगारांना मिळणाऱ्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संयोगिताताई गाढवे यांच्या वतीने हे अभियान पार पडले. … Read more

हरिनामाच्या गजरात माऊलींचा पालखी सोहळा पद्मावती मातेच्या दर्शनाला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आळंदी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पर्व काळात तिर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सातव्या माळेला पद्मावती मातेच्या दर्शनासाठी हरिनामाच्या गजरात आगमन झाले. दुपारी बारा वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुका पालखीतून पद्मावती मातेच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली. दुपारी एक वाजता पद्मावती मंदीरात आगमन झाल्यानंतर आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते आई … Read more

बीबीदारफळचे शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ प्रथम

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश मंडळांचा सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश मंडळांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ, बीबीदारफळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सन २०२४ मध्ये साजरा करण्यात आलेल्या श्री गणेश उत्सवाच्या दरम्यान सामाजिक सलोखा टिकावा यासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत … Read more

गहाळ झालेले १३ मोबाईल तक्रारदारांना परत

बार्शी तालुका पोलिसांची मोठी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गहाळ झालेले १३ मोबाईल शोधून तक्रारदारांना पोलिसांनी परत केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून या गहाळ मोबाईलचा शोध घेण्यात आला. गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण १३ … Read more

घरफोडी करणाऱ्या चोराच्या आवळल्या मुसक्या

विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी करणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल, कार, असा एकूण ३,८५,९५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून हडपसर, मुंढवा, चंदननगर, भोसरी पोलीस ठाण्यातील एकूण ४ गुन्हे उघड झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात घरफोडीचे गुन्हे गेल्या काही दिवसांत … Read more