आवृत्ती , पुणे

धाराशिव’ला मिळाली ओळख – ओमराजेंच्या पाठपुराव्याला यश

उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर अखेर ‘धाराशिव’ – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या ऐतिहासिक अस्मितेला न्याय देणारा ऐतिहासिक निर्णय अखेर घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून ‘उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे’ अधिकृत नामांतर करून ‘धाराशिव रेल्वे स्थानक’ असे करण्यात आले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. या नामांतरासाठी खासदार ओमप्रकाश (ओमराजे) … Read more

वैष्णवी हगवणे यांचे बाळ कस्पटे कुटुंबियाकडे सुपूर्द

सुशील, राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी : तिघांच्या कोठडीत वाढ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जमीन खरेदीसाठी वैष्णवी शशांक हगवणे हिचा छळ करून तिला मारहाण करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वैष्णवीच्या ९ महिन्यांच्या मुलाचा शोध घेऊन त्याला वैष्णवीचे आई-वडील, कस्पटे कुटुंबियाकडे सोपवण्यात आले. दरम्यान, … Read more

पुणे रिंगरोडसाठी ४० वर्षांची टोलवसुली मंजूर

अडीच वर्षांत रिंगरोड पूर्ण करण्याचे उद्दिष्ट : १२ टप्प्यांत बांधकामाचे नियोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या धर्तीवर पुणे रिंगरोड विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या प्रकल्पासाठी रोड मॅप तयार करण्यात आला असून, रस्त्याचे काम अडीच वर्षांत पूर्ण … Read more

जमिनीच्या हिस्सेवाटपासाठी मोजणी फक्त २०० रुपयांत

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; महसूलमंत्री बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता शेतीच्या जमिनीच्या हिस्सेवाटपासाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून, ही मोजणी केवळ २०० रुपयांत होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट दिलासा … Read more

कोंढवा बुद्रुकमध्ये अवैध बांधकामांवर कारवाई

महापालिकेनी केली कारवाई : नागरिकांमध्ये तीव्र संताप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा बुद्रुक, सर्वे नंबर ५ येथे महापालिकेच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवला. या कारवाईमध्ये चार दोन मजली घरे आणि पाच दोन मजली पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना काल रात्री उशिरा नोटीस … Read more

लग्नानंतर केवळ एका महिन्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

लग्नात मनासारखा हुंडा न दिल्यामुळे सासरी होत होता छळ : पतीसह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लग्नात नवरदेवाला ४ तोळे सोने दिले आणि १० लाख रुपये खर्च करून १८ एप्रिल २०२५ रोजी लग्न लावून दिले. तरीही लग्नात मनासारखा मानपान न दिल्याच्या कारणावरून मुलीला सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून नवविवाहितेने १९ मे २०२५ … Read more

बार्शीतील सेंट जोसेफ शाळेचा शंभर टक्के निकाल : गुणवंत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

८६ पैकी २४ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा अधिक गुण; पाच विद्यार्थ्यांचे विषयात शंभर पैकी शंभर गुण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ‘सेंट जोसेफ सीनियर सेकंडरी स्कूल, बार्शी’ या नामांकित शाळेने यंदाही 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण 86 … Read more

गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी पंकज देशमुख

राजेश बनसोडे – पश्चिम प्रादेशिक विभाग, तर संजय पाटील यांच्याकडे प्रशासन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेले देशमुख यांची नुकतीच पदोन्नतीनंतर पुणे शहर पोलीस दलात बदली करण्यात आली होती. देशमुख यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश … Read more

बार्शी शहरात मध्यप्रदेशातील घरफोडी टोळीचा पर्दाफाश

सात घरफोड्यांची कबुली : चार आरोपींना सत्र न्यायालयाकडून शिक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील दिवसा घरफोडी प्रकरणी मध्यप्रदेश येथील चार सराईत आरोपींना सत्र न्यायालय, बार्शी यांनी शिक्षा सुनावली आहे. यामध्ये तीन आरोपींना ५ ते ७ वर्षे कारावास व दंड, तर चोरीचे सोने वितळवून विक्री करणाऱ्या सोनारास ७ वर्षे कारावास व ₹ ५,००० दंड … Read more