आवृत्ती , पुणे

मुंढव्यात घर फोडून अडीच लाखाची चोरी

मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रोशन व्हिला, सह्याद्री पार्क, मुंढवा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची घटना १८ ते १९ सप्टेंबरदरम्यान घडली आहे. या प्रकरणी ७८ वर्षीय वृद्धेने फिर्याद दिली आहे. स. नं. ४८/१/२/१, रोशन व्हिला, सह्याद्री पार्क, … Read more

वडगावशेरीतील मिरवणुकीत दोघांचा मृत्यू

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये चौघावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिम बॉईज यंग फ्रेंड्स सर्कल, मंडळाने वडगावशेरी येथे मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकी दरम्यान झेंडा फिरवताना विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:४० … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना शस्त्रासह अटक

उत्तमनगर पोलिसांची कारवाई, अल्पवयीन मुलगाही ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना शस्त्रासह अटक करण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्या कडून धारदार शस्त्रेही जप्त केली आहेत. एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले असून तीन जण पळून गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत जमले असल्याची माहिती पोलिसांना … Read more

कोयता बाळगणारा तडिपार सराईत गुन्हेगार अडकला जाळयात

बिबवेवाडी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बेकायदेशीररीत्या कोयता बाळगणारा आणि परिसरात दहशत निर्माण करणारा रेकॉर्डवरील तडीपार सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ सप्टेंबर रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले आणि पोलीस अंमलदार शिवाजी येवले व सुमित तापकीर यांना रात्रगस्तीदरम्यान माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील … Read more

‘टाटा पॉवर’ च्या वापरात नसलेल्या जमिनी ताब्यात घ्या : अजित पवार

मुळशी धरण भागातील नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : मुळशी धरण भागातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी, दळणवळणाच्या सुविधा, विद्युत दाहिनी यांसारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी वारंवार निर्देश देऊनही टाटा पॉवरकडून सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुळशी धरण भागातील टाटा पॉवर कंपनीच्या वापरात नसलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करून, … Read more

मॉर्निग वॉक करताना मंगळसूत्र हिसकावले

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टिंगरेनगर येथे एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक दरम्यान दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंगरेनगर मधील एक तरुणी रविवारी (दि. २२ सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास सनशाईन हॉटेलच्या समोरील रस्त्यावर शारदा हॉटेलजवळून … Read more

पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ५ वर्षांपासून १८ गुन्ह्यांतील फरार आरोपीस अटक केली असून आवताडे शुगर फॅक्टरी, मंगळवेढा येथील चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री आवताडे शुगर फॅक्टरी, बालाजी नगर, … Read more

पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने केली मारहाण

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कुबेरा कॉलनी, एन.आय.बी.एम रोडवर घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी (२२ सप्टेंबर) एस. टायर या पंक्चर दुकानात त्यांच्या … Read more

अल्पवयीन मुलाने वृद्धास केली मारहाण

सिंहगडरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन मुलाने डोक्यात दगड घालून एका वृद्ध नागरिकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ सप्टेंबर रोजी रात्री १०:३०च्या सुमारास टू-व्हीलर गॅरेजच्या दुकानासमोर, गणेश कॉलनी, महादेव नगर, … Read more

पेट्रोल, डिझेल चोरी प्रकरणी मडीखांबे टोळीवर मकोका कारवाई

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: लोणीकाळभोर येथील टँकरमधील अवैध डिझेल आणि पेट्रोल चोरी प्रकरणातील सूत्रधार प्रविण सिद्राम मडीखांबे (टोळी प्रमुख) आणि त्याच्या ११ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध पेट्रोल आणि डिझेल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान कुंजीरवाडी थेऊर फाटा (ता. हवेली, जि. … Read more