आवृत्ती , पुणे

बार्शी बाजार समितीसाठी विजय राऊतांसह तिघे अशासकीय सदस्य

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : राज्याच्या पणन मंत्रालयाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शीचा कारभार पाहण्यासाठी अशासकीय समितीची नेमणूक केली आहे. अशासकीय समितीच्या अध्यक्षपदी (मुख्य प्रशासक) विजय राऊत (नाना) यांची तर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच या समितीत शाहूराजे संतोष निंबाळकर व ओंकार नानासाहेब धायगुडे यांचीही सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. निवड होताच … Read more

प्राचार्या के.डी. धावणे यांना दलित मित्र गौरव पुरस्कार २०२४ प्रदान

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बार्शी येथे पुरस्कार सोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या प्राचार्या के.डी. धावणे यांना दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी येथे सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. मच्छिंद्र … Read more

शाळा सुरक्षा परिषदेत १२०० शाळांचा सहभाग

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘शाळा सुरक्षा परिषदेला’ शहरातील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा सुरक्षा परिषद कार्यक्रमासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सुमारे १२०० शाळांमधील सुमारे २४०० मुख्याध्यापक आणि सचिव सहभागी झाले होते. बदलापूरमधील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पुणे शहरातील सर्व … Read more

शब्दांची शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त शब्दसुमने पुणे : जैन तत्त्वानुसार शब्द काय आहेत? तर ते एक स्वतंत्र अस्तित्व आहे. संपूर्ण ब्रह्मांडात शब्दांची शक्ती आहे. याचा अंदाज लावता येईल का? तर नाही. पण जोपर्यंत लोक आहेत, तोपर्यंत शब्दांची देवाण-घेवाण होतच राहील, असे प्रतिपादन पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन मालेत … Read more

दत्ताभाऊ खवळे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय – प्रशांत जगताप

शिवसेना उबाठा दहीहंडी उत्सव उन्नतीनगरमध्ये जल्लोषात साजरा, विविध पक्षीय नेते सहभागी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उन्नतीनगर गाडीतळ येथे भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या नृत्याची पर्वणी, गोपाल भक्तांचा उत्साह यामुळे दहीहंडी जल्लोषात साजरी झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख दत्ताभाऊ खवळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित दहीहंडीमध्ये कसबा … Read more

उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढेच कमावून जास्तीत जास्त सत्कर्माची कमाई करा

प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी बिबवेवाडी जैन स्थानकात केले मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सर्वमान्य आहे की द्रव्यरूपी मालमत्ता आपल्याला इथेच सोडावी लागते. ती आपल्याबरोबर पुढच्या प्रवासासाठी येत नाही, तर कर्मरूपी मालमत्ताच आपल्याबरोबर पुढे येते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढीच मालमत्ता कमावून, जास्तीत जास्त सत्कर्माची कमाई करण्याचे उद्दिष्ट आपण जीवनात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन प.पु. … Read more

राजाराम पुलाजवळ महिलेचे मंगळसूत्र हिसकवले

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे : राजाराम पुलाजवळ असलेल्या पद्मावती मंदिराकडे जात असताना एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ६५ वर्षांची आहे. ती मंदिराकडे पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या एका … Read more

वाहतूक कोंडी सोडवताना तरुणास मारहाण

लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: वाहतूक कोंडी सोडवताना दोघांनी तरुणास मारहाण करून त्याच्या अंगावर गाडी घातल्याची घटना तुळापुर आळंदी रोडवर घडली आहे. पोलिसांनी दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. फिर्यादी तरुण हा कुरकुंडी (ता. खेड, राजगुरुनगर) त्याच्या … Read more

सातत्यपूर्ण मेहनत, कौशल्य व स्मार्टनेस यशाची गुरुकिल्ली

स्नेहल नवलखा यांचे मत; सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा दीक्षांत सोहळा उत्साहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या वतीने २०२१-२०२४ या तुकडीचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्राचार्या डॉ. सायली पांडे, उपप्राचार्या रेणुका घोसपुरकर, विभागप्रमुख … Read more