आवृत्ती , पुणे

शिक्षिका परदेशात स्थायिक,  तरीही पगार घेतेय भारतात

गुजरातच्या सरकारी शाळेतील घटना : चौकशीचे आदेश पालनपूर : अमेरिकेत स्थायिक झाल्याने गुजरात मधील एक शिक्षिका जवळपास आठ वर्षे नोकरीवर गैरहजर राहिली; मात्र या काळात त्यांचा पगार नियमित सुरू होता. ही घटना गुजरातच्या एका सरकारी शाळेतील असून, राज्य सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने दिली. ‘शिक्षिका भावना पटेल वर्षातून … Read more

आम्हाला जुनीच पेन्शन द्या, नवी नको मागणीसाठी मोर्चा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आम्हाला नवी पेन्शन नको, जुनीच द्या या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी  मोर्चाकाढून  जोरदार  घोषणाबाजी  केली. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. मोर्चामध्ये पुणे जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील कर्मचारी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने … Read more

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी लांबणीवर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील दाव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी होणारी सुनावणी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादी हे पक्ष आणि या चिन्हांच्या दाव्याचा खटला प्रलंबित आहे. न्यायालयाने याआधी दिलेल्या तारखांनुसार राष्ट्रवादीशीसंबंधित प्रकरणाची सुनावणी मंगळवारी तर शिवसेनेशी संबंधित प्रकरणाची सुनावणी बुधवारी होणार होती. मात्र शिवसेनेशी संबंधित प्रकरणाची सुनावणी … Read more

शांतता रॅलीमध्ये नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरीस

विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : पुणे शहरात आरक्षणासाठी रविवारी (ता. ११) निघालेल्या शांतता रॅलीमध्ये चोरट्यांनी सोनसाखळी, मोबाईल आणि रोकड चोरी केल्याच्या घटना घडल्या. मोठ्या संख्येने लाखो नागरिक सहभागी झाले होते. त्या गर्दीचा चोरट्यांनी गैर फायदा घेतला. रविवारी या घटनामध्ये सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी विश्रामबाग आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात … Read more

ऑलिम्पिकच्या संयोजनाच्या परीक्षेत पॅरिस पास, आता लक्ष्य लॉसएंजेलिस कडे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पॅरिस : अखेर ऑलिम्पिकचे सूप वाजले. ऑलिम्पिकच्या संयोजनाच्या परीक्षेत पॅरिस पास झाले. आता लॉसएंजेलिस  कडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. अखेरच्या शंभर दिवसांचे काउंटडाउन सुरू होते, त्यावेळी यशस्वी संयोजनाबाबत शंका घेतली जात होती. ‘सिटी ऑफ लाइट’ मधील ऑलिम्पिक काही आठवड्यांवर असताना फ्रान्समध्ये राजकीय पेच निर्माण झाला होता. सुरक्षा यंत्रणेला हल्ल्याची धास्ती होती. फ्रान्सवासीय … Read more

शेअर मार्केटच्या बहाण्याने ९५ लाखांची फसवणूक

सांगवी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून एकाची ९५ लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत सांगवी येथे घडला. या प्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ‘वेल्थ फायनान्स अॅकॅडमी’चे … Read more

चाकणमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

चाकण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : भरधाव जाणाऱ्या टेम्पोने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (९ ऑगस्ट) सकाळी ७:४५ सुमारास चाकणमधील माणिक चौकात घडली. या प्रकरणी अक्षय रोहिदास केदारी (वय ५९, रा. वाकी, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब बाजीराव लामखेडे (वय ३९, रा. केळवाडी, ता. संगमनेर, … Read more

सहा पदकांसह भारताच्या ऑलिंपिक मोहिमेची सांगता

८४ पदकविजेत्यांमध्ये भारत ७१ व्या स्थानी नवी दिल्ली : भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये दुहेरी आकड्यांच्या पदकांची अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाही. सहा पदकांवर भारताला समाधान मानावे लागले. नेमबाजी, कुस्ती, भालाफेक व हॉकी या खेळांमध्ये भारतीयांनी पदके जिंकली. अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया यजमान फ्रांसचा या स्पर्ध्येत दबदबा दिसून आला.मनू भाकर, सरबज्योत सिंग, स्वप्नील कुसाळे, नीरज चोप्रा … Read more

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

गुन्हे शाखेची कारवाई : कोंढव्यातील चोरीची कबुली पुणे : कोलवडी व कोंढवा परिसरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आरोपीने कोंढव्यातील चोरीची कबुली दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे … Read more

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी २४ तासात पकडला

लोणीकाळभोर पोलीसांची कामगीरी पुणे : घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन बंगला फोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व इतर साहीत्य चोरी करून फरार असलेल्या आरोपीला २४ तासात लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमबहादुर दोदी दौमाई (वय- ४३, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, … Read more