आवृत्ती , पुणे

ब्लॅक मॅजिकच्या नावाखाली वृद्धेला २९ लाखांचा गंडा

मुलीतील दोष दूर करण्यासाठी लंगर घालण्याचा बहाणा; बालेवाडीतील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फेसबुकवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका वृद्ध महिलेला मुलीतील दोष दूर करण्याच्या बहाण्याने दोन व्यक्तींनी तब्बल २८ लाख ८८ हजार ७२२ रुपयांचा गंडा घातला. लंगर घालणे, पूजा करणे आणि ब्लॅक मॅजिक करण्यासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता असल्याचे सांगून हा प्रकार घडला. बालेवाडी … Read more

प्रियकराने प्रेयसीच्या पतीची दुचाकी पेट्रोल टाकून जाळली

भेटण्यास नकार दिल्याचा राग, रामटेकडीमधील गुरुवारी पहाटेची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एकेकाळची प्रेयसी लग्न झाल्यानंतर तिच्या संसारात रमली होती. तरीही प्रियकर तिला भेटण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता. तिने भेटण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीच्या पतीच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत शेजारील दुसऱ्या दुचाकीलाही आग लागली. ही घटना रामटेकडी येथे गुरुवारी पहाटे … Read more

जनता वसाहतीत सलग दोन दिवस वाहनांची तोडफोड

जुन्या भांडणाचा वाद; ३८ ते ४० वाहनांच्या काचा फोडल्या, दोघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जनता वसाहतीत जुन्या भांडणाच्या वादातून सलग दोन दिवस रस्त्यावर लावलेल्या वाहनांच्या काचा फोडण्याच्या घटना घडल्या. या घटनेत सर्वसामान्य नागरिकांच्या ४० वाहनांचे नुकसान झाले, त्यामध्ये ९ रिक्षांचा समावेश आहे. याबाबत पोलीस अंमलदार आनंद चव्हाण यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

भारतातील शेअर मार्केट सायबर फसवणुकीचे मुळ कंबोडियात

फसवणुकीसाठी लागणाऱ्या बँक खात्यांचे रॅकेट चालवणारे सहा जण अटकेत: हजारो खात्यांची माहिती कंबोडियाला पाठविली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतातील विविध शहरांतील नागरिकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा कमावण्याचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जात आहे. या मोठ्या घोटाळ्याचे मुळ कंबोडियात असल्याचे एका तपासातून स्पष्ट झाले आहे. झारखंड, गुजरात आणि ओडिशातील व्यक्ती पुण्यात … Read more

पुणेकरांसाठी नवा सुरक्षा फॉर्म्युला

‘कॉप्स २४’ तत्काळ मदतीसाठी सज्ज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करताच मदतीसाठी धावून येणारे बीट मार्शल आता ‘कॉप्स २४’ नावाने ओळखले जाणार आहेत. या माध्यमातून ७०० पोलिस कर्मचारी पुणेकरांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध राहणार आहेत. सध्या या कॉप्सना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून, त्यांच्यासाठी वेगळा ड्रेस कोडही असणार आहे. गुन्हे शाखेकडून … Read more

बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या येमेनी नागरिकांवर कारवाई

५ येमेनी पुरुष, २ महिला व्हिसा संपल्यावरही रहात होते पुण्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत ५ येमेनी पुरुष आणि २ येमेनी  महिला पासपोर्ट व्हिसाची मुदत संपल्यानंतरही पुण्यात राहात असल्याचे आढळले. त्यांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ५३ परदेशी नागरिकांना २०२४ मध्ये … Read more

दोन कोटींचा अपहार करणाऱ्या मनुष्यबळ विकास अधिकाऱ्याला अटक

कामगारांचा पीएफ, जीएसटी, विम्याचे पैसे नातेवाईकांच्या खात्यावर वळविले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपनीच्या मनुष्यबळ विकास अधिकाऱ्याने विश्वास संपादन करून कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार स्वतःच्या ताब्यात घेतले. या विश्वासाचा गैरफायदा घेत, त्याने कंपनी सोडून गेलेल्या कामगारांना कामावर दाखवून, कामगारांचे भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) आणि जीएसटीमध्ये पैसे न … Read more

दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाचा खून

सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून खून : कोंढव्यातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दारू पिताना झालेल्या वादातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून त्याचा खून केला. ही घटना कोंढव्यातील भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधीधाम येथे सोमवारी दुपारी घडली. काही तासांतच कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बारिश ऊर्फ बार्‍या संजय खुडे (वय २१, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, … Read more

भोरमधील चार घरे फोडून २६ लाखांचा ऐवज लंपास,

सीसीटीव्हीवरून लागला हाताला : आंतरराज्य सराईत घरफोड्या जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क भोर : भोर शहरातील मध्यवर्ती श्रीपतीनगर येथे एका रात्रीत चार घरांमधून ९ लाख रुपये , १८ तोळे सोने, २ किलो ७०० ग्रॅम चांदी असा २६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून आंतरराज्य घरफोड्या सराईत गुन्हेगाराला … Read more

एनव्हीसीएल क्रिकेट लीग : पीस्क्वेअर अचिव्हर्स चॅम्पियन

थालाज 7 उपविजेता : स्पर्धेचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : न्यू व्हेंचर क्रिकेट लीग (एनव्हीसीएल) सीझन-01 अंतर्गत झालेल्या अंतिम सामन्यात पीस्क्वेअर अचिव्हर्स (फ्रेश-प्राश ग्रुप) यांनी चॅम्पियन्स किताब पटकावला. उपविजेतेपद थालाज 7 (आरव अग्रवाल) संघाने मिळवले. हा सामना १९ जानेवारी २०२५ रोजी पुण्यात पार पडला. हा सामना प्रेक्षकांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादासह पार पडला. अंतिम सामन्यात … Read more