आवृत्ती , पुणे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तरुणीची फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे वाढते प्रकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, सुरुवातीला थोडीशी रक्कम परत देत, नंतर कोणताही परतावा न देता एका तरुणीची १७ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत, शिवाजीनगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. … Read more

स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुक २०२४ च्या कामकाजाच्या अनुषंगाने गणेश कला क्रीडा रंगमंच (Ganesh Kala Krida Manch) स्वारगेट येथून मतदान प्रक्रियेच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पी.एम.पी.एम.एल बसेसच्या वाहनतळाकरीता जागा उपलब्ध व्हावी, तसेच पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता १९ व २० नोव्हेंबर २०२४ रोजी स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात येत आहे. … Read more

दोघा गुंडांकडून काळेपडळ पोलिसांनी २ गावठी पिस्तुलं, ४ काडतुसे जप्त

साठेनगरमधील तरवडे वस्तीत दहशत माजविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरातील साठेनगर येथील तरवडे वस्तीत दहशत माजविण्यासाठी पिस्तुलं बाळगणाऱ्या दोघा सराईत गुंडांकडून काळेपडळ पोलिसांनी २ गावठी पिस्तुलं व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक केलेल्यांची नावे रितेश बाबासाहेब कसबे (रा. तरवडे वस्ती, साठेनगर, हडपसर) आणि राहुल संजय चौधरी (रा. साठेनगर, हडपसर) अशी … Read more

अ‌ट्टल चोरट्यास २४ तासाच्या आत केले जेरबंद

बार्शी शहर गुन्हे शाखेची कामगिरी : चार लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर गुन्हे प्रकटीककरण शाखेने घरफोडी करणाऱ्या अ‌ट्टल चोरट्यास २४ तासाच्या आत जेरबंद करून चोरीस गेलेला ४,२९, २१०/- रूपये किमंतीचा मुददेमाल हस्तगतकरण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रविण शिवशंकर थळकरी (रा. बुरुड गल्ली बार्शी ता. बार्शी ) यांच्या … Read more

चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी लांबविली

शांतीसाठी दान देण्याचा बहाणा करून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मावशीच्या आत्म्याच्या शांतीसाठी २ हजार रुपये दान करायचे आहेत. आपल्याला सुतक असल्यामुळे मंदिरात जाऊ शकत नाही, असे सांगून भामट्यांनी ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील ८० हजार रुपयांची सोनसाखळी फसवून लांबवली. याबाबत कोंढवा येथील एका ७१ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा … Read more

अवैध धंदे बंद असताना गुन्हे शाखेची मोठी कारवाई

गावठी दारु विक्री करणाऱ्या १९० जणांना अटक : जुगार खेळणारे ११४ जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील सर्व अवैध धंदे बंद असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला होता. त्याला वरिष्ठ अधिकारीही दुजोरा देत होते. असे असताना विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. महिन्याभरात केलेल्या … Read more

अपहरणानंतर ठेकेदाराचा तासाभरात निर्घुण खुन

मृतदेहाचे तुकडे करुन खडकवासला बॅकवॉटरमध्ये फेकले, तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मॉर्निग वॉकला गेलेल्या विठ्ठल पोळेकर यांना मामा चला, जरा तुमच्याकडे काम आहे, असे म्हणून त्यांना कारमध्ये बसविले आणि खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमधील ओसाडे गावाजवळ नेऊन त्यांचा खुन केला. अपहरण करुन चौघांनी त्यांचा तासाभरातच खुन केला. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते खडकवासला … Read more

मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान साहित्य व मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात भारतरत्न सर विश्वेश्वरय्या हॉल, येथे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाला निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले, प्रशिक्षण कक्षाचे नोडल अधिकारी बाळकृष्ण वाटेकर, २० मतमोजणी पर्यवेक्षक, २० मतमोजणी सहायक आणि २० मायक्रो ऑब्झर्व्हर … Read more

येरवड्यातील टोळीप्रमुखांसह चौघांना केले तडीपार

पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरातील रेकॉर्डवरील गुंडांच्या गुन्हेगारीवर निर्बंध ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी टोळी प्रमुख व त्याचे सदस्य असलेल्या ४ सराईत गुन्हेगाराना एका वर्षासाठी तडीपार केले आहे. टोळीप्रमुख वनराज महेंद्र जाधव (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), टोळी सदस्य यशराज आनंद इंगळे … Read more

खडक पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पिस्टलासह केले जेरबंद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधानसभेच्या अनुषंगाने गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीवरुन खडक पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले.साहील मजिद खान (वय २७, रा. घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, लोहियानगर) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना खडक पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना … Read more