आवृत्ती , पुणे

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात २ ऑक्टोबर पर्यंत मनाई आदेश लागू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दि. 18 सप्टेंबर 2024 सकाळी 08 वा पासुन ते 02 ऑक्टोबर 2024 रात्री 08 वा. पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) व 37 (3) (अ ते फ) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात … Read more

बिबवेवाडीतील फ्लॅट फोडून दहा लाखांची चोरी

बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील फ्लॅट फोडून दहा लाखांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान, भरदिवसा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी बिबवेवाडीतील ६१ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

एन्जॉय ग्रुपवर पोलीसांकडुन मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

लोणीकंद पोलीस स्टेशने दिला होता प्रस्ताव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या ‘एन्जॉय ग्रुप’वर लोणीकंद पोलीसांकडून मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. स्वारगेट येथे २०१३ साली झालेल्या कुणाल शंकर पोळ यांच्या खुनाचा वचपा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘एन्जॉय ग्रुप’च्या एकूण आठ आरोपीं विरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशनकडून मोक्का कायद्याच्या प्रस्तावास अपर पोलीस … Read more

गणपती मंडळातून पूजेच्या साहित्याची चोरी

शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर येथील गणेश मंडळामधून पूजेच्या साहित्याची चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रणव मेमाणे (वय २५ वर्षे, रा. विठ्ठल मंदिरासमोर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजीनगर गणेश मंडळ … Read more

नशा येणाऱ्या इंन्जेक्शनची विक्री करणारा पकडला

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारा तरुण हडपसर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून २५ हजार रुपयांची ३९ नशेची इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ सप्टेंबर रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना … Read more

मोबाईल चोरणारे चोरटे अटकेत, २१ मोबाईल जप्त

फरासखाना पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या मध्य प्रदेश व नाशिक जिल्ह्यातील टोळी पैकी दोन आरोपींना अटक करण्यात फरासखाना पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून २,७९,०००/- रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण २१ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ सप्टेंबर रोजी फिर्यादी (रा. … Read more

लोढा फाउंडेशनच्या वतीने फूड पॅकेटचे वितरण

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्व. सुभाष गणेशमलजी लोढा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवामध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या सुमारे सात हजारहून अधिक पोलीस बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष हर्षद लोढा यांनी केले होते.

परदेशी नागरिकाला लुबाडणाऱ्या आरोपीला पकडले

येरवडा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परदेशी नागरिकाला लुबाडणाऱ्या आरोपीला येरवडा पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १४ (सप्टेंबर) रोजी शास्त्रीनगर चौकात परदेशी नागरिक पायी चालत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी इसमांनी फिर्यादीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा … Read more

चोरट्याकडून साडेतीन लाखांचे १६ मोबाईल जप्त

युनिट २ गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेकार्डवरील मोबाईल चोरट्याकडून ३,७५,०००/- रुपये किमतीचे १६ मोबाईल फोन गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जप्त केले आहेत. गणपती उत्सवानिमित्त पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी प्रताप मानकर व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करत होते. पथकातील … Read more

कोंढवा रस्त्यावर भरदिवसा गोळीबाराचा थरार

वाळूव्यावसायिकावर हल्ला, तिघांना घेतले ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका वाळू पुरवठादार व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. ही घटना कात्रज कोंढवा साळवे गार्डन कान्हा हॉटेल चौकाजवळ प्राइड हॉस्पिटल समोर गंगाधामला जाणाऱ्या रस्त्यावर चोरडीया कॉर्नरजवळ घडली. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप गायकवाड असे जखमी व्यापाऱ्यांचे … Read more