आवृत्ती , पुणे

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण

सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण केल्याची घटना सहकारनगर भागात घडली असून, पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी २४ वर्षीय पत्नीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात … Read more

भांडण मिटवताना तरुणावर जीवघेणा हल्ला

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: भांडण मिटवण्यासाठी आलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना झील कॉलेज परिसरात घडली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुरेश परमेश्वर भिलारे (वय १८ वर्षे, रा. मराठा हॉटेल जवळ, न-हे) यास अटक केली आहे. न-हे येथील स्वाद … Read more

पुण्यात तरुणीचा निर्घृण खून, मृतदेह आढळला नदीपात्रात

चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात एका तरुणीचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे. खराडीतील मुळा-मुठा नदीपात्रात एका सुमारे ३० वर्षांच्या तरुणीचा मृतदेह आढळला असून, तरुणीचे हातपाय आणि शीर धडावेगळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खून झालेल्या तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. खराडी परिसरात नदीपात्रालगत एका इमारतीचे … Read more

सोलापूर जिल्ह्यात दारू धंद्याविरुद्ध मोहीम

६५ गुन्हे दाखल, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूरच्या ग्रामीण भागात अवैध धंद्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. ६५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ६,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रण आणि अवैध … Read more

गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाखाचा गंडा

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने कोंढवा परिसरातील नागरिकाची ११ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला आहे. अनोळखी तरुणाने  फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधून विश्वास संपादन केला. मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले पण … Read more

गुंतवणुकीच्या आमिषाने १३ लाखाची फसवणूक

विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने लोहगावातील नागरिकाची १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ ते २८ मे दरम्यान हा प्रकार घडला आहे. अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधून विश्वास संपादन केला. फिर्यादीस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडुन त्यांचे … Read more

आदर्शनगरच्या बंगल्यातून चंदनाचे झाड चोरीस

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड परिसरातील आदर्शनगरच्या बंगल्यातून चंदनाचे झाड चोरीस गेल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशिलदत्त बंगला, आदर्श नगर, प्लॉट नं.३० येथे राहणाऱ्या फिर्यादीच्या घराच्या कंपाउन्डमध्ये असलेले १५,०००/- रुपये किमतीचे जुने चंदनाचे झाड चोरट्यांनी … Read more

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

टेंभुर्णी पोलीसांची कामगीरी : २४ तासाच्या आत कोयता गँगचे आरोपी केले गजाआड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड यांचेवर धारदार हत्याराने हल्ला करणारे आरोपी हे पुणे येथुन खाजगी वहानांने सोलापुर कडे पळून निघाले असल्याची माहिती सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळताच त्यांनी नाकाबंदीचे आदेश दिले … Read more

पादचारी युवकाला मारहाण, लुटण्याचा प्रयत्न

वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वानवडीतील डोमिनोज पिझ्झा दुकानाच्याजाळून पहाटेच्या सुमारास पायी जाणाऱ्या एका तरुणाला दुचाकीवर आलेल्या दोघांनी मारहान केली. या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे पहाटेच्या वेळी पायी चालत जात असताना दुचाकी वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीस तुझ्याकडे काय … Read more

जुगार खेळताना नऊ जणांना पकडले, चार लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापूर ग्रामीण पोलीस व मंगळवेढा पोलिसांनी टाकला छापा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मंगळवेढा : सोलापूरला नवीन पोलीस अधीक्षक आल्यानंतर पोलीसदल सक्रीय झाले आहे. गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सोलापुर ग्रामीण पोलीस पथकाने व मंगळवेढा पोलिसांनी संयुक्तरित्या जुगार आड्यावर छापा टाकुन जुगार खेळणाऱ्या ९ आरोपीना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल … Read more