आवृत्ती पुणे

अटक न करण्यासाठी लाच मागणारा पोलिस अंमलदार जाळ्यात

लाचलुचपतची कारवाई : सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वीज चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करून ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलिस अंमलदाराला रंगेहात पकडले. तसेच त्याला प्रोत्साहन देणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ बापू … Read more

अहिल्यानगरमधील पोलिसांची चौकशी

घायवळ पारपत्र प्रकरणी पुणे पोलिसांकडून पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना नोटीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळच्या पारपत्राची पोलीस पडताळणी करणाऱ्या अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना त्यांना नोटिशीद्वारे देण्यात … Read more

वारजे व प्रभात रोड परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले

अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास : दोन स्वतंत्र घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वारजे आणि प्रभात रोड परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील एकूण अडीच लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेल्याच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या आहेत. पहिली घटना वारजेतील सिप्ला फाऊंडेशनजवळील पूजा हायलँड सोसायटी परिसरात घडली. तक्रारदार महिलेच्या पतीचे किराणा दुकान तळमजल्यावर आहे. शनिवारी (११ ऑक्टोबर) … Read more

तुळशीबागेत महिलेच्या पर्समधून रोकड चोरी करणाऱ्या दोन महिला अटक

विश्रामबाग पोलिसांची तत्पर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिवाळीनिमित्त तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून रोकड चोरणाऱ्या दोन महिलांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिसा सोहेल शेख (वय ४०) आणि मेहराज सोहेल शेख (दोघी रा. पद्मजी पोलीस चौकीजवळ, भवानी पेठ) अशी आहेत. या प्रकरणी एका ३८ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस … Read more

कुजलेल्या अवस्थेतील तरुणाच्या खुनाचा उलगडा

दादागिरीमुळे सहकारी मजुरानेच केला खून : भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रजमधील निंबाळकरवाडी भागात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी खून करणाऱ्या त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. खून झालेल्याचे नाव सद्दाम उर्फ सलमान शेख (वय ३५, रा. निंबाळकरवाडी, कात्रज) असे आहे, तर अटक … Read more

महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी गुंड टिपू पठाणविरुद्ध गुन्हा

जागेवर शेड बांधून भाड्याने दिल्या : ताबा सोडण्यासाठी २५ लाखांची खंडणी मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात दहशत माजविणारा कुख्यात गुंड टिपू उर्फ रिझवान सत्तार पठाण आणि त्याच्या साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन त्यांनी पत्र्याच्या शेड बांधल्या व त्या भाड्याने देऊन उत्पन्न … Read more

नीलेश घायवळचा पूर्वीचा साथीदार संतोष धुमाळसह तिघांवर ‘मोक्का’

तुझ्यामुळे मला अटक झाली : १० लाखांची मागणी केली होती खंडणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “तुझ्यामुळे मला अटक झाली, १० लाख रुपये दे, नाहीतर गोळ्या खायला तयार राहा,” अशी धमकी देऊन तरुणाकडे खंडणी मागणाऱ्या गॅंगस्टर नीलेश घायवळचा एकेकाळचा साथीदार संतोष धुमाळ याच्यासह तिघांवर पोलिसांनी ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली आहे. संतोष आनंद धुमाळ, सागर गवासने … Read more

वेश्या व्यवसायाला लावलेल्या दोन तरुणींची सुटका

ब्युटी पार्लरमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखविले होते : भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ब्युटी पार्लरमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखवून पश्चिम बंगालहून पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावलेल्या दोन तरुणींची भारती विद्यापीठ पोलिसांनी सुटका केली. दलालाला अटक करण्यात आली असून त्याची पत्नी फरार आहे. राजू चिद्रवार (पाटील) (वय २५, रा. आंबेगाव पठार) असे … Read more

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पाषाण भागातील एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी तब्बल एक कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more