आवृत्ती पुणे

मोहोळ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

गोवंशीची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई : ७ आरोपी अटकेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर ग्रामीण : मोहोळ पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गोवंशीची अवैध तस्करी व वाहतूक करणाऱ्या संघटित टोळीवर कठोर कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर मोठा आघात बसला आहे. मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत गोवंशाची अवैध … Read more

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस वाहतुकीत बदल

ईव्हीएम वाटप, मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी वाहतूक निर्बंध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील काही भागांत तीन दिवस वाहतुकीत बदल केले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम वाटप, त्यांची वाहतूक, तसेच मतदान केंद्रे व मतमोजणी ठिकाणांच्या परिसरात वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली … Read more

महापालिका निवडणूक काळात २५६ गुन्हेगारांवर कारवाई

परिमंडळ एक परिसरात १२ ठिकाणी रूट मार्च, ८९ जणांना हद्दीतून केले तडीपार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणूक शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडावी, यासाठी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी या काळात तब्बल २५६ गुन्हेगारांवर विविध प्रकारची कारवाई केली आहे. निवडणूक प्रचारावर कोणताही प्रभाव पडू नये, यासाठी ८९ गुन्हेगारांना परिमंडळ एकच्या हद्दीतून तडीपार … Read more

पूजा खेडकर यांच्या बंगल्यावरील दरोड्याप्रकरणी एकाला अटक

चतु:श्रृंगी पोलिसांकडून नोकराच्या वडिलांना मुंब्रावरून ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाणेर रोडवरील बंगल्यात दरोड्याची घटना घडल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. खेडकर यांच्या बंगल्यात तिच्या आई-वडिलांसह पाच जणांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून दरोडा टाकण्यात आला होता. खुम्मा दिलबहादुर शाही (वय ४०, रा. कौशल, मुंब्रा, जि. ठाणे) … Read more

RTO दंडाचे बनावट ई-चलन पाठवून सायबर फसवणूक

नातेवाईकाच्या नावाने एपीके फाईल पाठवून अडीच लाखांना गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) वाहतूक नियमभंगाबाबत दंडात्मक कारवाई केल्याचे बनावट ई-चलन पाठवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची तब्बल २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कात्रज येथील ४५ वर्षीय नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी … Read more

श्री गोदम्बाजी–रंगनाथजी विवाह सोहळा भक्तिभावात संपन्न

धनुर्मासानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात दोन दिवसीय धार्मिक उत्सव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : धनुर्मासाच्या पवित्र निमित्ताने माँ आशापुरा माता मंदिर, गंगाधाम चौक, पुणे येथे श्री गोदम्बाजी–रंगनाथजी यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. हा दोन दिवसीय धार्मिक सोहळा १० व ११ जानेवारी रोजी पारंपरिक वैदिक विधी, पूजा-अर्चा आणि मंगलकार्यांच्या साक्षीने संपन्न झाला. … Read more

प्रेमप्रकरणावरून नायजेरियनांमध्ये झालेल्या वादात मित्राचा खून

पिसोळीतील घटना, काळेपडळ पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्टुडंट व्हिसा आणि बिझनेस व्हिसावर येऊन पुण्यात राहणाऱ्या नायजेरियन तरुणांमध्ये प्रेमप्रकरणावरून झालेल्या वादात चौघांनी मित्रावर छोट्या कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. येमेकाक्रिस्टी एन (वय ३८, रा. शार्लिन अ‍ॅव्हेन्यू सोसायटी, धर्मावत पेट्रोल पंपाजवळ, पिसोळी) असे खून झालेल्याचे नाव आहे. … Read more