आवृत्ती , पुणे

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

16 वर्षाच्या मुलावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे – लग्नाचे आमिष दाखवून एका १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याने त्यात ही मुलगी ७ आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याबाबत चंदननगर पोलिसांनी एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हा … Read more

सराईत गुन्हेगारांकडून दोन पिस्टल, काडतुस हस्तगत

अल्पवयीन असल्यापासून करत होते गुन्हे : धायरीतील आंबाईदरा येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अल्पवयीन असल्यापासून गुन्हे करणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांकडून नांदेड सिटी पोलिसांनी दोन गावठी पिस्टल व एक काडतुस जप्त केले आहे. साजन विनोद शहा (वय १९, रा. धायरीगाव) आणि कुणाल शिवाजी पुरी (वय १८, रा. धायरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. … Read more

सीएनजी पंपावर गॅसचे नोझल उडाले

कामगाराला डोळा कायमचा गमवावा लागला : धनकवडीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सी एन जी पंपावर गॅस भरत असताना गॅसचे नोझल उडून तो डाव्या डोळ्यावर जोरात लागल्याने कामगाराला डावा डोळा कायमचा गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार धनकवडीतील तीन हत्ती चौकातील एस स्क्वेअर सी एन जी पंपावर रविवारी सायंकाळी साडेसहा च्या … Read more

राज्यात थंडीची लाट पुणेकर गारठले, किमान तापमान ७.८ अंश सेल्सिअस

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यात थंडीची लाट आली आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान सिंगल डिजिट राहिले असून या हंगामातील निच्चांकी तापमान ७.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. डिसेंबर महिन्यात पुण्यात आतापर्यंतचे निच्चांकी सर्वात कमी किमान तापमान ३.३ अंश सेल्सिअस २७ डिसेंबर १९६८ रोजी नोंदविले गेले … Read more

वाचन संस्कृती जिवंत ठेवणे काळाची गरज – मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे. अशा पुस्तक महोत्सवांचे आयोजन केल्यास समाजातील मूल्येही जपली जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यातील पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ग्रंथांशी … Read more

सराईत गुन्हेगाराकडून २ पिस्टल, ६ काडतुसे जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट २ ची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरासह पनवेल, सांगली येथे १६ हून अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगाराकडून गुन्हे शाखेच्या युनिट २ ने २ पिस्टल व ६ काडतुसे जप्त केली आहेत. निलेश ज्ञानेश्वर भरम (वय ३५, रा. साई सिद्धी चौक, आंबेगाव) असे या गुंडाचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे … Read more

जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना १९५१ च्या कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नववर्ष स्वागत व पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादनाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अन्वये २५ डिसेंबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान केले आहेत. रस्त्यावर किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा प्रकारे चालावे, … Read more

पुणे शहरात आगीच्या ४ घटना : कोंढव्यात गंभीररित्या भाजल्याने एकाचा मृत्यू

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात १३ डिसेंबर रोजी आगीच्या चार घटना घडल्याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, कोंढवा मिठानगर, शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलजवळ आणि येरवडा लक्ष्मीनगर येथे आगीच्या घटना घडल्या आहेत. तीन ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याची माहिती दलाने दिली आहे. तर कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी येथे आगीच्या गंभीररित्या भाजलेल्या व्यक्तीचा … Read more

इंद्रेश्वर साखर कारखान्यात सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न

वाहनचालकांना रस्ते सुरक्षेचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : इंद्रेश्वर साखर कारखाना येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने “सुरक्षित ऊस वाहतूक अभियान” यशस्वीपणे पार पडले. या उपक्रमात वाहनचालकांना ऊस वाहतूक करताना रस्ते सुरक्षेचे पालन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक अविनाश अंभोरे यांनी वाहनांच्या पुढील बाजूस आणि … Read more

कुंथलगिरी येथे रथयात्रा महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील कुंथलगिरी येथे रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे रथयात्रा महोत्सव १५ डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता पूजा व अभिषेक होणार आहे. दुपारी २:०० वाजता सर्व मंदिरांवर ध्वजारोहण करण्यात येईल, तर दुपारी … Read more