आवृत्ती , पुणे

वर्धमान जैन वाचनालयात महात्मा गांधी जयंती साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली. श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षा वर्षा गुंदेचा (खांडवीकर) यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी … Read more

माँ आशापुरा माता मंदिरात गुरुवारपासून नवरात्र उत्सव

विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट च्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख विजय भंडारी व चेतन भंडारी यांनी दिली. यावर्षीच्या … Read more

कोहिनूर ग्रुपचे राजेश गोयल यांना ‘डिजिटल इंफ्लूएंसर अवॉर्ड’ने गौरव

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कोहिनूर ग्रुपचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश गोयल यांना पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘डिजिटल इंफ्लूएंसर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईतील विक्रोळी येथील ताज द ट्रीस हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे … Read more

स्वारगेटजवळ युवकाचा मोबाईल हिसकावला

खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी पायी जाणाऱ्या युवकाचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना भरदिवसा स्वारगेटच्या जेधे चौकात घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण १ ऑक्टोबर रोजी सव्वा वाजता पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्या हातातील … Read more

किरकोळ वादातून लोखंडी सळईने मारहाण

सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून युवकाला लोखंडी सळईने मारहाण केल्याचा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी पवार (वय २०, रा. धनकवडी) यांच्या आईला ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास शनिमंदिराजवळ चव्हाणनगर येथे एका … Read more

पुण्यात होणार सात नवीन पोलीस ठाणी

राज्य शासनाचा निर्णय : ६० कोटींचा निधी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराचा वाढलेला विस्तार, वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने पुणे शहरात आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी येथे नवीन पोलीस ठाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने पुणे शहरातील सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली … Read more

सोलापूर विमानतळाचे उद्घाटन : विकासाला मिळणार चालना

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ म्हणजे सोलापूरच्या विकासाचा रनवे अवकाशात झेपावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी आभासी पद्धतीने या विमानसेवेचे उद्घाटन झाले असून, सोलापूरसाठी ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे. फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोलापुरात विमानसेवेचा शुभारंभ झाला होता. उद्योगपती विजय मल्ल्या … Read more

जैन समाजाला महामंडळ कधी

शासनाचे सर्व समाजाकडे लक्ष : सर्वाधीक कर देणाऱ्याकडे मात्र दुर्लक्ष महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : देशाच्या विकासासाठी सर्वाधीक जास्त कर भरणारा समाज म्हणून जैन समाजाकडे पाहिले जाते. देशासह राज्याच्या जडणघडणीत जैन समाजाचा नेहमी मोठा वाटा राहिला आहे. मात्र निडणुका तोंडावर येऊन देखील या शासनाला जैन समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याची गरज वाटत नाही. अहिंसाप्रीय जैन समाज … Read more

भूमच्या आयटीआय : आता आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम याचे नाव बदलून आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम असे ठेवण्याचा शासनाचा निर्णय जाहीर झाला आहे. या नामांतर सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. राज्य सरकारने महाराष्ट्रातील १४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलून थोर समाजसुधारकांच्या नावांवर ठेवली आहेत. यामध्ये भूम येथील शासकीय औद्योगिक … Read more

सराईत चोरट्याकडून पिस्तोल, जिवंत काडतूस जप्त

लोणीकंद पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलिसांनी पुणे-नगर रस्त्यावर कारवाई करत, जबरी चोरी करणाऱ्या दोघांकडून १ वाहन, १ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. लोणीकंद पोलिसांनी मागील ३० दिवसांत ८ देशी बनावटीची पिस्तुल आणि २६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more