अमिताभ गुप्ता : वानवडी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन
पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पोलीस स्टेशन किंवा पोलीसांसाठी बनविण्यात आलेली सर्व कार्यालये हे जनतेच्या सेवेसाठीच असतात आम्ही अधिकारी फक्त दोन वर्षासाठी ती सांभाळत असतो. ही कार्यालये मोठी,देखणी व स्वच्छ असावीत अशी अपेक्षा पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकी शेजारीच बनवलेल्या वानवडी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सह आयुक्त रविंद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त नम्रता पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टीळेकर, नगरसेविका रुपाली धावडे, मानसी देशपांडे, रंजना टिळेकर, हसीना ईनामदार, साईनाथ बाबर, गफूर पठान, संगीता ठोसर, वृषाली कामठे, वर्षा साठे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक वानवडीचे पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांनी केले होते.
यावेळी पुणे शहारातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरक्षीत जागा शोधून पोलीस स्टेशन बांधले जाणार असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगीतले.पुण्यात नव्याने दोन पोलीस स्टेशनचे काम सुरु होत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगीतले, या कार्यालयातून नागरिकांना चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करीत आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या.