विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास
महाराष्ट्र 360 न्यूज
लोहगाव येथे शनिवारी भरदिवसा एकाच अपार्टमेंटमधील दोन फ्ल्टमध्ये झालेल्या घरफोडीत एकूण पाच लाखांच ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान निंबाळकर कॉम्प्लेक्समधील फ्लॅट नं. १०२ तसेच फ्लॅट नं. १०३, (वडगाव शिंदे रोड, लोहगाव, पुणे) येथे यातील फिर्यादी (संदेश तोंडारे, वय ३६, रा. सी/ओ सुदर्शन निंबाळकर, फ्लॅट नं १०२, निंबाळकर कॉम्प्लेक्स, वडगाव शिंदे रोड, लोहगाव, पुणे) यांचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून त्यावाटे आंत प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील १३,००० रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २,१२,२५० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला.
तसेच फिर्यादी यांच्या शेजारील फ्लॅट नं. १०३ मधील स्वप्निल यांच्याही फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्यावाटे आत प्रवेश करुन बेडरूममधील लोखंडी व लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने ७२,५००/- रुपये आणि ५.५०० रुपये रोख रक्कम असा दोन्ही मिळून एकूण २,८४,७५० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून नेला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. ए. जाधव पुढील तपास करत आहेत.
