हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : माळवाडी रोडवर मोपेडस्वारांचे कृत्य
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज
धक्का मारून १२,००० रुपये किमतीचा मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी दोघा अज्ञात मोपेडस्वारांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.
या प्रकरणी रंजित म्हात्रे (वय २५, रा. हडपसर पुणे) यांनी मोपेड गाडीवरील अनोळखी दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि. ०५ मे २०२१ रोजी रात्री आठ वाजता माळवाडी रोड, हडपसर, पुणे येथे यातील फिर्यादी हे सिझन मॉल येथून माळवाडी रोडने त्यांच्या राहत्या घरी जात असताना, मोपेडवरून आलेल्या दोन इसमांनी फिर्यादीस धक्का मारण्याच्या बहाण्याने त्यांचा खाली पडलेला १२,००० रुपये किमतीचा मोबाईल फिर्यादीच्या नकळत चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार एन. एम. ढवळे अधिक तपास करत आहेत.
