लष्कर पोलीस स्टेशन : कोर्टाच्या परवानगीने होणार लिलाव
महाराष्ट्र 360 न्युज
पुणे :लष्कर पोलीस स्टेशन येथे मागील अनेक दिवसापासून पडून असलेला जुना मुद्देमाल कोर्टाच्या परवानगीने पोलिसांनी लिलावात काढला आहे.
यामध्ये जुने लॅपटॉप,कपडे,मोबाइल,कार टेप अशा अनेक वस्तू असणार आहेत.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लष्कर पोलीस स्टेशनमध्ये हा लिलाव होणार आहे.
यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो.न्यायालयाची परवानगी असल्यामुळे हा माल घेण्यास कसलीही अडचण नाही.अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
