कोंढवा पोलीस स्टेशन : आयुक्तांनीही केले कौतुक
महाराष्ट्र ३६० न्युज
इंस्टाग्रामवर ओळख करून व जवळीक वाढवून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते असे धमाकाऊन पैसे उकळणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी गजाआड केले आहे.सोशल मिडीयाच्या विविध साईडवरून अशा प्रकारे नागरीकांना जाळ्यात ओढले जात आहे.या गोष्टीला पुढील काळात या कारवाईमुळे चाप बसणार आहे.
कोंढवा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना न्यु पनवेल ता. पनवेल जिल्हा रायगड येथील महिला हिने इंस्टाग्रामवर ओळख करून इंटग्रामवरून जवळीक वाढवून फिर्यादी यांना सदर महिला व इतर मोबाईल धारक इसम तसेच त्यांच्या साथीदारांनी अडवुन मारहाण करून बलात्काराचा गुन्हा दाखल करतो असे म्हणुन पैश्याची मागणी करून, त्यांना जबदस्तीने लुबाडून धमकी दिली होती.
पोलीस सदर मोबाईल धारकाच्या मोबाईल नंबरची माहिती प्राप्त करून मोबाईल धारकाचा शोध घेत असताना सदर मोबाईल धारक हा गारवा हॉटेल बोपदेव घाट येथे असल्याची बातमी पोलीस नाईक गणेश चिंचकर यांना मिळाली. त्यानुसार कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस हवालदार योगेश कुंभार, पोलीस नाईक गणेश चिंचकर, पोलीस शिपाई महेश राठोड, पोलीस शिपाई अभिजीत रत्नपारखी यांनी सापळा रचुन सदर मोबाईल धारकास गारवा हॉटेल येथून ताब्यात घेवून त्याचे नाव व पत्ता विचारला. त्याने त्याचे नाव रविंद्र भगवान बदर, वय २६ वर्षे धंदा मंजुरी, रा. भिगवण एस. टी.थांबा जवळील नितीन जाधव यांच्या स्विट होमच्या मागे, ता इंदापुर, जि. पुणे असे सांगीतले. त्यावेळी त्याच्या सोबत असणारा व्यक्ती सचिन वासुदेव भातुलकर, वय २२ वर्षे, मु.पो. अकोला, मोठी उंबरी, ता. अकोला जि. अकोला यास ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याच्याकडून माहिती प्राप्त झाली की,
रविंद्र भगवान बदर, सचिन वासुदेव मातुलकर, आण्णा राजेंद्र सांके अमोल साहेबराव ढवळे, मंथन शिवाजी पवार, एक महिला वय १९ वर्षे, रा.येवलेवाडी, पुणे यांनी मिळुन आप आपसात संगणमत करुन सदर महिला हिने फिर्यादी यांच्या इंट्राग्राम व्हॉटसअपवर एका महिलेचे नावाने ओपन केलेल्या अंकाउन्ट वरुन ओळख करून मैत्री केली होती. त्या मैत्रीतुन ओळख वाढवून महिला आरोपी हिने फिर्यादी यांना येवलेवाडी येथील फ्लँटवर बोलावून घेतले. त्यांनतर फिर्यादी हे सदर फ्लॅटवरुन निघुन जात असताना त्यास सचिन वासुदेव भातुलकर, रविंद्र भगवान बदर, आण्णा राजेंद्र सांळुके, अमोल साहेबराव ढवळे, मंथन शिवाजी पवार, आरोपी महिला यांनी कोंढवा पुणे येथे अडवुन हाताने मारहाण करुन आरोपी महिलेवर हिच्यावर शारिरीक संबंध प्रस्थापीत केले म्हणुन तक्रार देतो असे सांगुण त्याच्याकडून ५० लाखाची खंडणीची मागणी करून, ५ लाख रुपये खंडणीची रक्कम घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे फिर्यादी यांच्याकडून रोख ५००००/ रुपये व ३०,०००/- रु. एटीएम मधुन काढुन अशी एकुण ८०,०००/- रुपये घेवून त्याच्याकडून आरोपी महिला हिच्या सोबत लग्न करणार असे जबरदस्तीने लिहून घेतले.
या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे हे करत आहेत. सदर बाबत पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा तपास पथकाचे कौतुक केले आहे. अशा प्रकारे हनीट्रॅपद्वारे आणखी इसमांना लुबाडले असल्याची शक्यता आहे. तरी कोणाला अश्या प्रकारे लुबाडले असल्यास कोंढवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे नागरीकांना आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
