समर्थ पोलीस स्टेशन : दोन वाहन चोरी व चार मोबाईल चोरीचे गुन्हे उघड
महाराष्ट्र ३६० न्युज
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली,मात्र पोलिसी खाक्या दिसताच त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. समर्थ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मोठी कामगिरी करत अनेक पोलीस स्टेशनला हवा असलेल्या सराईत आरोपी सुलतान शेख याला बेड्या ठोकल्या आहेत.
स्वांतत्र्य दिना दिवशी समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे हदीमध्ये पेट्रोलींग करीत होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना त्यांच्या बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, नाना पेठ आझाद आळी मध्ये एक इसम चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे. ही बातमी मिळताच तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा लावून पोलीस अंमलदार जितेंद्र पवार व धिरज शिंदे यांनी बातमीतील वर्णनाच्या इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव सुलतान रिजवान शेख वय १९ वर्ष रा. लक्ष्मीनगर, जामा मस्जिद जवळ, राकेश जनरल स्टोअर्स जवळ गल्ली नं. १२. येरवडा पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्या जवळील मोबाईल बाबत विचारणा केली असता त्यांने उड़वा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
पोलीसी खाक्या दाखवताच सदरचा मोबाईल त्याने नाना पेठ येथुन चोरल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता त्याने साधारण दिड महिन्यापूर्वी गणेश पेठ येथून हिरो होंडा पँशन प्लस ही गाड़ी चोरली असल्याचे सांगीतले. तसेच त्याने दोन दिवसापूर्वी बोत्रेआळी, सासवड, ता. पुरंदर येथून पार्कीग मधून होंडा डिओ ही गाडी चोरली या बाबत कबुली दिली. तसेच सदर आरोपीने दोन दिवसापूर्वी नायडू हॉस्पीटल जवळ एक मोबाईल चोरी केल्याचे पण सांगीतले. आरोपीकडे एकंदरीत आणखी तीन मोबाईल मिळून आल्याने सदरच्या मोबाईल मालकांचे शोध घेण्याचे काम चालू आहे.
सदरची कामगिरी ही डॉ. संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, प्रियंका नारनवरे पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१, सतिश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, विष्णु ताम्हाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,समर्थ पो.स्टे, उल्हास कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार सहा. पोलीस निरीक्षक संदीप जोरे सपोउपनिरीक्षक सतिश भालेराव, पोलीस अंमलदार जितेंद्र पवार, धिरज शिंदे, सुमित खुट्टे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले महेश जाधव यांनी केली आहे.
