महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेच्या अनुदानित दिव्यांग भवन फाउंडेशनसाठी ४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण ३१ संवर्गांमध्ये ४० उमेदवारांची निवड करण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात ३ संवर्गांमध्ये ३ उमेदवारांची निवड करण्यात आली. कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली असून, सर्व पात्र उमेदवार कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व यूडीआयडी (UDID) कार्डधारक दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग भवन येथे भेट देऊन सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवनात लवकरच ‘दिव्यांग कक्ष’ सुरू करणार आहोत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दमिट यांनी दिली.

