गायरानात आढळला होता मृतदेह : स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बोरीभडक (ता. दौंड, जि. पुणे) येथे एका तृतीयपंथीयाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या गायरानात रविवारी (दि.21) सकाळी साडे नऊच्या सुमारास तृतीयपंथीयांचा मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि यवत पोलिसांनी आठ तसात अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
मगरध्वज मारुती बंडेवाड उर्फ बंटी (वय-26 रा. कोळवाडी ता. अहमदपूर जि. लातूर सध्या रा. थेऊर, ता. हवेली) असे खून झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. तर काजल उर्फ केशव उमाजी चव्हाण (वय-26 रा. रुई धानोरा, ता. गेवराई जि. बीड सध्या रा. थेऊर) असे अटक केलेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. याप्रकरणी मयत बंटीचा मोठा भाऊ पांडुरंग मारुती बंडेवाड (वय-28 रा. टिळेकर नगर, कात्रज) याने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी थेऊर फाटा ते सहजपुर फाटा या दरम्यान असेलले सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी मयत बंटी याच्यासोबत आणखी एकजण असल्याचे दिसून आले. पोलिसांना मयत बंडी सोबत असलेली व्यक्ती काजल चव्हाण असल्याची माहिती मिळताच काजलाचा शोध घेतला. काजलला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु सखोल चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. यवत पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त तपास केला.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागाय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, स्वप्नील लोखंडे, सचिन काळे, संदीप येळे,पोलीस हवालदार सचिन घाडगे, निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, गणेश करचे, राजीव शिंदे, संदीप देवकर, महेंद्र चांदणे,रामदास जगताप, मेघराज जगताप, निखिल रणदिव, सोमनाथ सुपेकर,मारुती बाराते, किरण तुपे यांनी केली आहे.
















