वाकड पोलिसांची कारवाई : सोशल मीडियावरून निर्माण केली दहशत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक भाई नव्याने तयार होत असून ते दहशत निर्माण करण्यासाठी इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप्प यासारख्या सोशल मीडियाचा वापरत करत असल्याचे आढळून आले आहे. सोशल मीडियावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे, पिस्तूलाचा व्हीडिओ व विविध प्रकारची चेतावणी वजा धमकीचे स्टेटस ठेवून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा अनेक घटना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घडल्या आहेत.
वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील आरोपी कृष्णा तुळशिराम राऊत (वय-22 रा. काळा खडक, वाकड) हा हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी डेअरी फार्मसमोर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल तपासला असता त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटस वर शेअर चॅटवरुन डाऊनलोड केलेला पिस्टलचा व्हिडिओ ठेवल्याचे आढळून आले. आरोपी विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापूसाहेब धुमाळ, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दिपक साबळे, अतिष जाधव, बाबा चव्हाण, अतिक शेख, प्रमोद कदम, व कैतेय खराडे यांच्या पथकाने केली.
