आवृत्ती , पुणे

प्रीपेड टास्कच्या बहाण्याने २२ लाखांची फसवणूक

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रीपेड टास्कच्या बहाण्याने २२ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार पेरणे फाटा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी तरुणाने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी 2024 दरम्यान फिर्यादी महिलेशी मोबाईलवर … Read more

पोलीस बोलत असल्याचे भासवून २७ लाखाची फसवणूक

पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपण सायबर क्राईम शाखेतून बोलत असल्याचे भासवून २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पानमळा, सिंहगड रोड परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी ७ जुलै रोजी मोबाईलवर संपर्क साधला. सायबर क्राईम शाखा, मुंबई येथून ऑफिसर बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या आधार कार्डचा … Read more

दुचाकीवरील चोरट्यांनी मोबाईल पळवला

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी बालगंधर्व परिसरातून पायी जाणाऱ्या महिलेचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी घडली. या बाबत डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला रात्री साडेदहाच्या सुमारास झाशी राणी चौक परिसरातून जात होत्या. त्याच वेळी, दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या … Read more

हाडोंग्री येथील घरकुलाच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम: मराठवाडा मुक्ती संग्रामाचे औचित्य साधून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या हस्ते घरांच्या मालकीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या, ज्यामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मालकीचे, छोटं का होईना, परंतु एक घर असावे असे स्वप्न असते. परंतु गोरगरीब, दलित मजुरांना हक्काचे घर मिळणे कठीण … Read more

भुमच्या आयटीआयचे आचार्य विद्यासागरजी आयटीआय नामकरण

शासनाच्या निर्णयाचे जैन समाजातर्फे स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता भुम : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महायुती सरकारने “आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुम” हे नाव दिल्यामुळे जैन संघटनेच्या वतीने सरकारचे आभार मानण्यात आले. भुम तालुक्यातील कुंथलगिरी हे जैन समाजाचे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. येथे महाराष्ट्र व देशभरातून हजारो जैन बांधव दर्शनासाठी येतात. त्यामुळे भुम येथील औद्योगिक … Read more

जबरी चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीना पकडले

येरवडा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जबरी चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून चोरी केलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री हॉस्पिटलसमोर, शास्त्रीनगर, येरवडा येथे पहाटे ५:२० वाजता फिर्यादी पायी चालत असताना मोटारसायकलवरील अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीचा मोबाईल आणि १७,५००/- रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसका मारून चोरली. … Read more

मुंढव्यात घर फोडून अडीच लाखाची चोरी

मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रोशन व्हिला, सह्याद्री पार्क, मुंढवा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची घटना १८ ते १९ सप्टेंबरदरम्यान घडली आहे. या प्रकरणी ७८ वर्षीय वृद्धेने फिर्याद दिली आहे. स. नं. ४८/१/२/१, रोशन व्हिला, सह्याद्री पार्क, … Read more

वडगावशेरीतील मिरवणुकीत दोघांचा मृत्यू

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये चौघावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिम बॉईज यंग फ्रेंड्स सर्कल, मंडळाने वडगावशेरी येथे मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकी दरम्यान झेंडा फिरवताना विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:४० … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना शस्त्रासह अटक

उत्तमनगर पोलिसांची कारवाई, अल्पवयीन मुलगाही ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना शस्त्रासह अटक करण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्या कडून धारदार शस्त्रेही जप्त केली आहेत. एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले असून तीन जण पळून गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत जमले असल्याची माहिती पोलिसांना … Read more

कोयता बाळगणारा तडिपार सराईत गुन्हेगार अडकला जाळयात

बिबवेवाडी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बेकायदेशीररीत्या कोयता बाळगणारा आणि परिसरात दहशत निर्माण करणारा रेकॉर्डवरील तडीपार सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ सप्टेंबर रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले आणि पोलीस अंमलदार शिवाजी येवले व सुमित तापकीर यांना रात्रगस्तीदरम्यान माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील … Read more