आवृत्ती , पुणे

पुण्यातील ‘बीडीपी’ आरक्षणासाठी अभ्यास गट

एका महिन्यात अहवाल देणार : ९७६ हेक्टर आरक्षित क्षेत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील डोंगरमाथा (हिलटॉप), डोंगर उतार विभाग (हिलस्लोप), तसेच समाविष्ट गावांमधील टेकड्यांवरील जैवविविध्य उद्यानाच्या (‘बीडीपी’) आरक्षणाबाबत सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अभ्यास गट स्थापन केला आहे. या अभ्यास गटाकडून डोंगरमाथा, डोंगर उतार तसेच ‘बीडीपी’च्या जागेवरील बांधकामांची सद्यस्थिती, … Read more

नोकरीच्या आमिषाने तरुणांना घातला गंडा

सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांकडून ८ तरुणांची लाखोंची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागातील कामाची टेंडर घेणाऱ्या दोन ठेकेदारांनी अनेक तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्रे देत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत आळंदी देवाची येथील २१ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी … Read more

हातभट्टीवर लोणीकंद पोलिसांचा धडक छापा

वाडेगाव येथे अवैध गावठी दारू निर्मितीवर कारवाई : १.८५ लाखांचा मुद्देमाल नष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारू तयार करण्यासाठी अवैध हातभट्ट्या लावल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आणि एक इसमावर गुन्हा दाखल केला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव … Read more

नगराध्यक्ष संजय गाढवे यांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सदिच्छा भेट

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : आज भुम नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष विकासरत्न श्री. संजय नाना गाढवे यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी मंत्री महोदयांशी विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. या भेटीप्रसंगी युवा सेना राज्य विस्तारक … Read more

घरकामासाठी मदतीला आलेल्या बहिणीच्या मुलीनेच केली चोरी

१ लाख ८० हजारांचा ऐवज परत न केल्याने पोलिसांकडे तक्रार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चिकनगुणियाचा त्रास असल्याने घरातील कामे करणे कठीण झाले होते. त्यामुळे फिर्यादी महिलेने आपल्या गावातील बहिणीच्या १९ वर्षांच्या मुलीला घरकामासाठी मदतीसाठी बोलावले. मात्र, तिच्यावर विश्वास ठेवून बोलावलेल्या त्या मुलीनेच ८० हजार रुपये रोख व एक लाख रुपये किमतीची सोन्याची चैन, असा … Read more

कर्ज मंजुरीच्या नावाखाली ३९ लोकांची फसवणूक

फसवणूक करणार्‍याला मुंबईहून पकडून आणले पुण्यात : त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली ३९ लोकांकडून एकूण १५ लाख ७८ हजार रुपये शुल्क म्हणून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शोधन भावे मुंबईत असल्याचे समजल्यावर, फसवणूक झालेल्या लोकांनी त्याला पकडून येरवडा … Read more

ल. म. कडू, हेमंतराजे मावळे यांना ‘कर्तृत्वरत्न’ पुरस्कार जाहीर

चिंतामणी हसबनीस, शीतल बापट, अरुण मेहेत्रे मानकरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आचार्य डॉ. माधव पोतदार यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘शब्दसारथी’च्या वतीने देण्यात येणारा ‘कर्तृत्वरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल ज्येष्ठ बालसाहित्यिक ल. म. कडू, शाहिरी परंपरेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल शाहीर हेमंतराजे मावळे, शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल श्यामची आई फाउंडेशनच्या … Read more

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त पुण्यात भव्य रक्तदान शिबिर

५१ बाटल्यांचे रक्त संकलन : मान्यवरांची उपस्थिती आणि जैन समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त महर्षीनगर, मुकुंदनगर येथील प्रतिभा नवकार जैन संघ, जय आनंद प्रतिभा नवकार जैन युवक मंडळ, प्रभा प्रतिभा महिला मंडळ आणि अर्हम महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेची … Read more

जिल्हा परिषदेच्या सेवकांकडून फसवणूक

जिल्हा बँकेचे बनावट शिक्के बनवून केली बनावट चलने; सेवक निलंबित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन अधिकार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना नुकतीच मोठी कारवाई केली होती. आता याच बांधकाम विभागातील आणखी एक घोटाळा समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या एका सेवकाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बनावट शिक्के वापरून कंत्राटदाराला बनावट … Read more

महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम शहरात भव्य मिरवणूक

महाराष्ट्र जैन वार्ता भूम : महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम शहरातील जैन समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून भगवान महावीरांच्या विचारांचा जागर केला. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम येथील कसबा जैन मंदिरातून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक बाजार रोड, गोलाई चौक, मेन रोड, नगरपालिका मार्गे मार्गक्रमण करत … Read more