आवृत्ती पुणे

होय तुम्हीच ‘मायमराठीच्या खऱ्या शिलेदार!’

मराठी शिकवणाऱ्या शिक्षिकांचा ‘शब्दसारथी’तर्फे विशेष सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असताना या मराठीचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे काम करणाऱ्या मराठी विषयाच्या शिक्षिकांना ‘मराठीचे खरे शिलेदार’ म्हणून सन्मानित करण्यात आले. अनंत अडचणींतून वाट काढत टिकून राहिलेल्या आणि गुणवत्ता राखलेल्या मराठी शाळांना या वेळी मानवंदना देण्यात आली. मराठी भाषा … Read more

जवानांकडून प्रत्येकाने शिस्त, प्रामाणिकपणा व देशप्रेम आत्मसात करावे

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन : ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांची ‘एनडीए’ला भेट महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्यु-सोशियो हेल्थ कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च आणि सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी खडकवासला येथील नॅशनल … Read more

काँग्रेस पक्ष स्थापन दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा

क्रिकेट स्पर्धेत वारेवडगाव संघ विजेता महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्ष स्थापन दिनानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत भूम तालुक्यातील विश्वनाथ महाराज क्रिकेट क्लब, वारेवडगाव संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघास काँग्रेस कमिटीचे विलास शाळू आणि भूम-परंडा-वाशी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज … Read more

तरुणाची रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या

प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार देणार्‍या तरुणीविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दोघे शेजारी राहणारे, एकमेकांचे ४ वर्षांपासून प्रेमसंबंधातून तिने लग्नाचे आमिष दाखवून सतत पैशांची मागणी केली. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने तरुणाने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. वानवडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. गणेश राजु सिंग (वय ३०, रा. गोसावी वस्ती, … Read more

महाराष्ट्रात जुन्या वाहनधारकांची लूट

वाहनांच्या उच्च सुरक्षा पाट्यांचे राज्यात जादा दर : कमी करण्याची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी उच्च सुरक्षा पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) ३० एप्रिल पूर्वी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना वाढीव दराने टेंडर देण्यात आले आहे. त्यामुळे इतर राज्यांतील दर … Read more

मंडळाच्या मुख्यालयातूनच नमुना उत्तर पत्रिका बाहेर

मोबाइलवर छायाचित्रे पाठविणार्‍या लातूरच्या नियामकावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात दहावी -बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षक मंडळाच्या (राज्य मंडळ) मुख्यालयातच गैरप्रकार घडल्याचे निदर्शनात आले आहे. लातूरच्या नियामकाने नमुना उत्तर पत्रिकेचे फोटो काढून दोन शिक्षकांना पाठविल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राज्य मंडळाच्या वतीने विजय … Read more

यंदा उन्हाळा ठरणार त्रासदायक

मार्च महिन्यात तीव्र उष्ण लाटांचा हवामान विभागाचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : देशाच्या बहुतांशी भागात यंदा उन्हाळा अधिक त्रासदायक ठरणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यापासून तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील (मार्च ते मे) तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. डी एस पे यांनी जाहीर केला. … Read more

बुलेटच्या मॉडिफाइड सायलेन्सरवर कारवाई

कोंढवा पोलिसांची विशेष मोहिम : २० बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बुलेटच्या सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. या विशेष मोहिमेअंतर्गत २० बुलेटच्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्याचबरोबर रमजान महिना देखील सुरू होत … Read more

सूर्यदत्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराची सांगता

युवाशक्तीच्या माध्यमातून परिवर्तन शक्य : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी आणि सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मुळशी तालुक्यातील कुळे गाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. … Read more