आवृत्ती पुणे

मेट्रोमनीवरील ओळखीतून फसवणूक करणाऱ्यास इंदौरहून अटक

दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदौर येथे गुन्हे दाखल : काळेपडळ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मेट्रोमनी साईटवरून महिलांशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करत, विश्वास संपादन करून वेगवेगळी कारणे सांगून लाखो रुपये हडप करणाऱ्यास काळेपडळ पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदौर येथून अटक केली. अमन प्रेमलाल वर्मा (वय ३८, रा. बिश्ना, जि. … Read more

प्रतिष्ठित सीएसआर हिरोज पुरस्काराने प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया सन्मानित

मुंबईत शानदार समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते गौरव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि बन्सी रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठित सीएसआर हिरोज अवार्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले. ४ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या परळ येथील … Read more

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणारा जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. राजू महादेव डेंगळे (वय २२, रा. प्रतिकनगर, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ३० जानेवारी रोजी पहाटे सुमारे पावणेसहा वाजता संबंधित महिला मॉर्निंग वॉकसाठी … Read more

युवचार्य प. पू. महेंद्रऋषीजी म. सा. यांचे स्वागत

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : उपाध्याय परमपूज्य गौतममुनिजी म. सा. यांच्या सुवर्ण दीक्षा महोत्सवानिमित्त आदिनाथ जैन स्थानकात युवाचार्य प. पू. महेंद्रऋषीजी म. सा. आदी ठाणा-3 यांचे आगमन झाले. 9 फेब्रुवारी रोजी वर्धमान सांस्कृतिक केंद्र, बिबवेवाडी येथे भव्य दीक्षा महोत्सवाचे आयोजन श्री श्वेतांबर स्थानकवासी सकल जैन समाज, पुणे जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी … Read more

दूषित पाणी हेच जीबीएसचे प्रमुख कारण

एनआयव्हीचा अहवाल : शुद्ध पाणीपुरवठ्याची गरज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) होण्याचे प्रमुख कारण दूषित पाणी असल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या तपासणीतून समोर आले आहे. खडकवासला धरणालगत असलेल्या गावांना शुद्धीकरण न केलेले पाणी पुरवले जात असल्याने या गावांमध्ये प्रामुख्याने जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. … Read more

प्रा. बोराडे यांना पीएचडी प्रदान

महात्मा फुले यांच्या विचारांवर संशोधन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथील समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक तसेच पाथरुड ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी रामभाऊ बोराडे यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. बोराडे यांनी संशोधन पूर्ण करून विद्यापीठास सादर केले होते. श्री जगदीशप्रसाद झांबरमल टिबड़ेवाला विश्वविद्यालय, झुंझुनूं, राजस्थान येथे “महात्मा फुले … Read more

राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबीर संपन्न

सामाजिक उपक्रम व आरोग्य जनजागृतीला उत्तम प्रतिसाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मावळ तालुक्यातील चिखलसे गावी विशेष हिवाळी शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले … Read more

बांधकामाविषयी गैरसमज पसरवून मागितली ५० लाखांची खंडणी

खडकवासला अभियंत्यांचा बनावट आदेश : सराईत गुन्हेगार सचिन जांभुळकरवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बांधकामासंदर्भात फ्लेक्स उभारून नागरिकांनी सदनिका खरेदी करू नये, यासाठी गैरसमज पसरविण्यात आला. पर्यावरण वाचवण्यासाठी वनीकरण करण्यासाठी परवानगी मिळाल्याबाबत पाटबंधारे विभागाचा बनावट आदेश तयार करण्यात आला. तसेच बांधकाम पूर्णत्वास न्यायचे असेल, तर ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला … Read more

पिस्टल बाळगणारा तरुण जेरबंद

सहकारनगर पोलिसांची मोठी कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे ; शायनिंग मारण्यासाठी कमरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक झालेल्या तरुणाचे नाव ऋतिक संजय ननावरे (वय २४, रा. विजयश्री अपार्टमेंट, बालाजीनगर) असे आहे. सोमवारी सहकारनगर पोलिसांचे तपास पथक पेट्रोलिंग करत … Read more

मंदिरासाठी ग्रेनाइट दगड विकत घेण्यासाठी दिलेल्या १८ लाखांचा अपहार

देणगी देण्याचा बहाणा करून फसवणूक : दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या नवीन मंदिरासाठी ग्रेनाइट दगड उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या १८ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चेन्नई येथील दोन व्यक्तींवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टला संस्थापक प्रभाकर … Read more