आवृत्ती , पुणे

दिशाभूल करणार्‍या बातम्यांची शासन घेणार त्वरीत दखल

वस्तुस्थितीदर्शक माहिती त्याच दिवशी देऊन करणार खुलासा, राज्य शासनाचा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना, धोरणे, प्रकल्प तसेच राज्यात घडणाऱ्या विविध घटनांबाबत अनेकदा वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. आता त्याची शासन त्वरीत दखल घेणार आहे. त्याच दिवशी वस्तुस्थितीदर्शक माहिती पुरवून योग्य खुलासा करण्यात येणार आहे. … Read more

घरावर संकट येणार सांगून भोंदू बाबाने घातला महिलेला गंडा

साडेतीन लाखांचे दागिने लंपास, हडपसर पोलिसांनी काही तासांत केली भोंदू बाबाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : त्याच्या सांगण्यावरून पतीचे दारूचे व्यसन काही दिवस सुटल्यामुळे महिलेला त्याच्यावर विश्वास बसला होता. या विश्वासाचा गैरफायदा घेत, त्याने “घरावर संकट येणार आहे,” असे सांगून “मंगळसूत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या, मी या वस्तू मंतरून देतो, म्हणजे तुमच्यावरील संकट … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे सापडली ४ पिस्तुले, १२ जिवंत काडतुसे

ग्रामीण पोलिसांची रांजणगावातील सोनेसांगवीत कारवाई, मध्य प्रदेशातून आणली अग्नीशस्त्रे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रांजणगाव परिसरातील सोनेसांगवी गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ग्रामीण पोलिसांनी तब्बल ४ गावठी पिस्तुले, ३ मॅगझीनसह १२ जिवंत काडतुसे असा १ लाख ८२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. सुरज राजेश पाडळे (वय २७, रा. सोनसांगवी, ता. शिरूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. … Read more

गुडी पाडव्याला ३०० कोटींची १० हजार वाहन खरेदी

गतवर्षीपेक्षा अधिक वाहनं, दुचाकीचं शहर होतंय चारचाकींचं पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुडी पाडवा. या दिवशी कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे शुभ मानले जाते. गुडी पाडव्याला वाहन खरेदी करणेही शुभ मानले जाते. पुणेकरांनी या गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल ३०० कोटी रुपयांची १० हजारांहून अधिक वाहने खरेदी केली आहेत. दुचाकींचं शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात, … Read more

अल्पबचत योजनांचे व्याजदर स्थिर

पहिल्या तिमाहीसाठी दर जाहीर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारने नव्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर स्थिर ठेवले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने ही घोषणा केली आहे. आर्थिक वर्षातील १ एप्रिल ते ३० जून २०२५ या पहिल्या तिमाहीसाठी मागील तिमाहीचेच व्याजदर कायम राहणार आहेत. सार्वजनिक भविष्य … Read more

बनावट पावत्या बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्याचा प्रयत्न; ८ पैकी ६ कंपन्या पुण्यातील महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) पुणे आयुक्तालयाच्या वसुली अधिकाऱ्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळवणे आणि ते चालवून घेण्यासाठी बनावट पावत्या तयार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या बनावट पावत्यांची अंदाजे रक्कम २५ कोटी रुपये इतकी आहे. इनपुट … Read more

पुण्यात ६५ हजार कोटींच्या ८९,०९३ घरांची विक्री

मुंबई, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरुला टाकले मागे; वायव्य पुणे, पिंपरी चिंचवडला पसंती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : २०२४ या वर्षात पुणे जिल्ह्यात तब्बल ८९,०९३ घरांच्या विक्रीतून ६५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, पुण्याने देशातील पाच महानगरांना मागे टाकले आहे. क्रेडाई पुणे मेट्रो आणि सीआरई मॅट्रिक्स यांनी प्रसिद्ध केलेल्या पुणे हाऊसिंग रिपोर्टमधून ही आकडेवारी समोर आली … Read more

पाळीव कुत्र्यासह जर्मनीला नेण्याचे दाखविले आमिष

लग्न करून पती एकटाच गेला जर्मनीला : पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “लग्न झाल्यानंतर तुला पाळीव कुत्र्यासह जर्मनीला घेऊन जाईन,” असे आमिष दाखवून लग्न केले. मात्र, पतीने तिच्या पासपोर्टला जाणीवपूर्वक उशीर होईल, असे कृत्य करून तिला जर्मनीला न नेता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय विवाहितेने लष्कर … Read more

एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठाला व्यसनी बनवून लुटले २४ लाख

वॉचमनच निघाला गुन्हेगार, हडपसर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला व्यसनाच्या आहारी नेऊन त्याच्या बँक खात्याचा अ‍ॅक्सेस घेऊन वेगवेगळ्या नातेवाईकांच्या नावावर पैसे ट्रान्सफर करून २४ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. या ज्येष्ठ नागरिकाच्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक आणि दैनंदिन गरजेच्या कामामध्ये मदत … Read more

अकरा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

वारजे परिसरातील घटना, उत्तमनगरमधील लॉजवर नेऊन बलात्कार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील वारजे परिसरातील एका ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माझ्याशी लग्न कर, नाही तर मारुन टाकेन, अशी धमकी देत एका नराधमाने या मुलीचे अपहरण करुन तिला लॉजवर नेऊन अत्याचार केला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले … Read more