आवृत्ती , पुणे

ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅटमध्ये चोरी करणारे अल्पवयीन ताब्यात

कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील घटना, अल्पवयीनांकडून साडेपाच लाखांचे दागिने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोथरूड भागातील हॅपी कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या फ्लॅटमधून साडेपाच लाखांचे दागिने चोरून पसार झालेल्या अल्पवयीनांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. हे दोघे अल्पवयीन सराईत गुन्हेगार आहेत. कोथरूडमधील हॅपी कॉलनीत राहणारे ज्येष्ठ नागरिक ७ मार्च … Read more

बांधकाम ठेकेदाराला एक कोटींचा गंडा

इन्कोफिना कन्सल्टंट कंपनीचे संचालक फरार, कोथरुड, चतु:श्रृंगी, डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा अडीच ते चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून इन्कोफिना कन्सल्टंट एलएलपीमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून बांधकाम ठेकेदाराला १ कोटी ५० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कोथरुड पोलिसांनी इन्कोफिना कन्सल्टंट एलएलपीचे संचालक अमर … Read more

घर खरेदीच्या कागदपत्रांवरून वृद्ध पतीचा पत्नीवर हल्ला

दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात काठीने मारले, चुलीच्या लाकडांना लावली आग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घर विकू नये म्हणून घर खरेदीची कागदपत्रे न दिल्याने, दारूच्या नशेत वृद्ध पतीने पत्नीच्या डोक्यात काठी मारून तिला जखमी केले. त्यानंतर चुलीसाठी जमा केलेली घरातील लाकडे पेटवून दिली. मात्र, शेजाऱ्यांनी वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी इंदुबाई विलास गायकवाड … Read more

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४५ लाखांची फसवणूक

खराडी, हडपसरमधील तरुणांना गंडा घातला : शेअर बाजार फसवणुकीत वाढती प्रवृत्ती महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची एकूण ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खराडी भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक … Read more

११० लोकांची २ कोटी ६६ लाखांची फसवणूक

वाहने विकत घ्यायला लावून केली विल्हेवाट, सात जणांवर गुन्हा, तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घनकचरा व्यवस्थापनाशी निगडीत विविध बनावट कंपन्या स्थापन करून त्यामध्ये गुंतवणूक करायला लावले. तसेच, भाडे तत्त्वावर वाहने घेऊ, असे सांगून लोकांना कार, दुचाकी, जेसीबी अशी वाहने खरेदी करण्यास भाग पाडले. ही वाहने भाडे तत्त्वावर घेतल्यानंतर परस्पर विकून टाकल्याचा प्रकार समोर … Read more

पबमध्ये महिला बाऊन्सरचा विनयभंग

डान्स फ्लोअरवर तरुणींना धक्का देऊन अश्लिल शिवीगाळ करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पबमधील डान्स फ्लोअरवर डान्स करत असताना ते डान्स करणार्‍या इतर तरुणींना धक्का मारत होते. ही बाब लक्षात घेऊन महिला बाऊंसरने त्यांना बाजूला डान्स करायला सांगितल्याच्या रागातून दोघांनी महिला बाऊन्सरला अश्लिल शिवीगाळ करुन विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणेश … Read more

गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची १ कोटी ४४ लाखांची फसवणूक

सत्यम जोशी पळाला दुबईला, अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शासकीय ठेक्यात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची १ कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य संशयित सत्यम जोशी हा एक वर्षांपूर्वी दुबईला पळून गेल्याचे सांगण्यात येते. … Read more

पोलिसांच्या तत्परतेमुळे ज्येष्ठ महिलेला दिलासा

गहाळ झालेल्या तीन तोळ्यांच्या मंगळसूत्राचा शोध : समर्थ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षातून प्रवास करताना गहाळ झालेले तीन तोळ्यांचे मंगळसूत्र समर्थ पोलिसांच्या तत्पर तपासामुळे ज्येष्ठ महिलेला परत मिळाले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रिक्षाचालकाचा शोध घेतला. कोंढवा परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या राधा अशोक अंकम (वय ६६) या रिक्षाने प्रवास करत होत्या. कसबा पेठेतील फडके … Read more

तरुणाला अडवून मारहाण करून भर दुपारी लुटले

मामाच्या मदतीने तरुणाने चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कामावरून सुटल्यावर भर दुपारी फॉरेस्ट पार्क रोडवरून जाणाऱ्या तरुणाला अडवून तिघांनी मारहाण करून त्याच्या खिशातील रोकड जबरदस्तीने चोरली. या तरुणाला मारहाण करत असताना पाठीमागून आलेल्या मामाच्या मदतीने एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. संतोष किशन राठोड (वय २१, रा. सुदामनगर, धानोरी) … Read more

वडापाव फुकट न देणाऱ्या आचार्‍याला लुटणारा गुंड जाळ्यात

सुपर बिबवेवाडीतील महादेव वडेवाले दुकानातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडापाव फुकट न दिल्याने दुकानातील आचाऱ्याला “मी इथला भाई आहे” अशी धमकी देऊन खिशातील २२०० रुपये जबरदस्तीने काढून लुटणाऱ्या गुंडाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. भारत बडगुजर (वय ३७, रा. दुर्गामाता गार्डनजवळ, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत मोहन परमार (वय … Read more