आवृत्ती , पुणे

बार्शी उपसा सिंचन आगळगाव रोड पुलाच्या कामाचे आमदार सोपल यांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ: बार्शी उपसा सिंचन योजनेच्या उजव्या कालव्यावरील कॅनॉलवरील सात पूल आणि उर्वरित कॅनॉलच्या सुमारे आठ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार सोपल म्हणाले की, अपक्षांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या युती सरकारच्या काळात भीमा-सीना जोड कालवा आणि त्यानंतर बार्शी उपसा सिंचन योजना … Read more

सुलाखे हायस्कूल बार्शी येथे क्रीडा सप्ताहांतर्गत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : सुलाखे हायस्कूल बार्शी येथे क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन प्रशालेच्या वतीने करण्यात आले. ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांच्या हस्ते प्रशालेच्या गरुड ध्वजाचे ध्वजारोहण व क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सुलाखे … Read more

गजा मारणेच्या नावाने १३ इंस्टाग्राम अकाऊंट अ‍ॅक्टीव्ह

गुन्हेगारी रील्स बनवून सोशल मीडियावर प्रसारित करणारे चौघे जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून समाजामध्ये भीती व दहशत पसरवणारे व्हिडिओ, रील्स सोशल मीडियावर टाकणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. गजानन मारणे याच्या नावाने तब्बल १३ इंस्टाग्राम अकाऊंट अ‍ॅक्टीव्ह असल्याचे उघड झाले आहे. अक्षय निवृत्ती शिंदे (वय २०, रा. निमगाव खालु, ता. श्रीगोंदा, जि. … Read more

अनैतिक संबंधांमुळे तरुणाचा खून

कोथरुडमधील घटना, चार अल्पवयीन मुले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: अनैतिक संबंधांमुळे एका तरुणावर अल्पवयीन मुलांनी पालघनने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. कोथरुड पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. राहुल दशरथ जाधव (वय ३०, रा. उंबरे, ता. भोर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ केतन … Read more

सरकारने काही मागण्या मान्य केल्यामुळे आंतरवली व बार्शीतील आमरण उपोषण मागे

८ पैकी ४ मागण्यांवर सरकारची सकारात्मकता : सहाव्या दिवशी उपोषण स्थगित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : आंतरवली येथे सुरू असलेले सामूहिक आमरण उपोषण सरकारने काही मागण्या मान्य केल्यामुळे आज सहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. सरकारने आठपैकी चार मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून उर्वरित मागण्यांसाठी पुढील लढाई सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आज आंतरवलीतील … Read more

महाकुंभमेळ्यात भीषण आग; चेंगराचेंगरीनंतर गजबजलेल्या क्षेत्रातील तंबू जळाले

महाकुंभाच्या सेक्टर-२२ मध्ये आग लागली, सुदैवाने जीवितहानी नाही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हरिद्वार : महाकुंभमेळ्यात एक भीषण आग लागली आहे. गुरुवारी महाकुंभाच्या सेक्टर-२२ मध्ये तंबूला आग लागली. घटनेनंतर अग्निशमन दलाने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. सुदैवाने, मंडपात कोणताही भाविक उपस्थित नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. महाकुंभाच्या सेक्टर-२२ परिसरात छतनाग … Read more

नळकनेक्शन तोडणीबाबतचा फसवणुकीचा ‘एसएमएस’!

महानगरपालिकेचे नागरिकांना सावधानतेचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात थकीत पाणीपट्टीधारक मालमत्तांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका वेळोवेळी अधिकृत ‘एसएमएस’द्वारे नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करत आहे. मात्र, काही फसवणूक करणारे व्यक्ती “आज रात्री ९ वाजता तुमचे नळकनेक्शन तोडण्यात येईल” अशा आशयाचा बनावट ‘एसएमएस’ पाठवत आहेत. “देवेश जोशी, महापालिका अधिकारी” … Read more

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 100 दिवसांची विशेष मोहीम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा समन्वय साधून संबंधित यंत्रणांनी कार्य करावे. यासोबतच 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमात वाहतूक सुधारणा उपाययोजना समाविष्ट कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. विधानभवन येथे आयोजित वाहतूक आढावा बैठकीत ते … Read more

भारताचं स्वतःचं AI मॉडेल दहा महिन्यांत येणार – केंद्र सरकारची मोठी घोषणा

भारतातील AI क्रांतीची नवी सुरुवात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात अमेरिकेचं वर्चस्व आहे. मात्र, चीनमधील लहानसं स्टार्टअप डीपसीकने ओपनएआय आणि जेमिनी यांसारख्या मोठ्या AI मॉडेल्सना आव्हान दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारत सरकारनं मोठी घोषणा केली आहे. भारत लवकरच स्वतःचं मोठं AI मॉडेल विकसित करणार असून, ते येत्या दहा महिन्यांत उपलब्ध … Read more

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१,२९९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजनेसाठी १,२९९ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच ७५३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त … Read more