आवृत्ती , पुणे

दुचाकी चोरणाऱ्या दोन आरोपींना पकडले

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुचाकी चोरणाऱ्या आरोपींकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. आरोपींकडून ९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये वाहनचोरीच्या गुन्ह्याचा … Read more

नफ्याच्या प्रलोभनाने युवकाची फसवणूक

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्टॉक मार्केट ट्रेडिंग व आयपीओ अलॉटमेंटमध्ये भरघोस नफा मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवून वडगाव शेरीतील एका तरुणाची ८ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ फेब्रुवारी ते दि. १५ मार्च २०२४ दरम्यान ऑनलाईन माध्यमांद्वारे फिर्यादी, २८ वर्षीय तरुणाशी, एका मोबाईल … Read more

शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने २० लाखांची फसवणूक

सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका तरुणीची २० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीत राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना ३ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान घडली. एका मोबाइल धारकाने त्यांच्याशी संपर्क साधून, शेअर ट्रेडिंग कंपनीचे … Read more

भारती विदयापीठ परिसरात मोबाईल हिसकावला

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ परिसरातून पायी जात असताना एका तरुणीचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही १९ वर्षांची तरुणी कात्रजमध्ये राहणारी असून, ती मोबाईलवर बोलत पायी चालत होती. उत्कर्ष सोसायटी जवळील गणेश मंदिरासमोर भर दुपारी दीड वाजता ही घटना घडली. तिने आरडाओरडा केला, पण चोरटा पळून गेला. तिच्या मदतीला कोणीही … Read more

सप्तसूर अकॅडमी तुमच्या आतला आवाज करेल “विकसित”

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रत्येक बोलणाऱ्या माणसाला आवाजाची ईश्वरदत्त देणगी मिळालेली असते. त्याचा सर्वजण चांगल्या प्रकारे उपयोग करत नाहीत, ही खंत आहेच. परंतु काही व्यवसायांसाठी चांगला, नितळ, स्वच्छ आवाज असणे हे भाग्यच आहे. मला वाटते की रेडिओतून आलेला असा आवाज तुम्हाला आकर्षित करत असतो. त्याशिवाय टीव्हीवरील निवेदक, नाटकातील नटांचा आवाज या सर्वच क्षेत्रांत तुमच्या आवाजाचा कस … Read more

अडीच लाखांचे अंमली पदार्थ जप्त, एकास केले जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी अडीच लाखांचे एल.एस.डी. व एम.डी.एम.ए. हे अंमली पदार्थ जप्त करून एकास जेरबंद केले आहे. त्याच्या कडून एकूण ४,१८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी पुणे शहरातील अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या … Read more

परंडा विधानसभा निवडणुकीत पहिला उमेदवार जाहीर

वंचित आघाडीकडून प्रवीण रणबागुल यांना उमेदवारी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे परंडा विधानसभा मतदारसंघातील पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी पक्षाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (दि. १६) … Read more

परंडा विधानसभा मतदारसंघात ३७६ मतदान केंद्रे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी, म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, आणि निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. परंडा विधानसभा मतदारसंघात ३७६ मतदान केंद्रे असून, निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. तहसील कार्यालय भूम येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद … Read more

सेटलमेंट करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहाय्यक फौजदार निलंबित

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दिवाळीच्या तोंडावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहायक फौजदार यांना निलंबित करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करून २ लाखांत सेटलमेंट करणारे गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे तत्कालीन वरिष्ठ … Read more

तयारीला लागा… आमदार व्हायचंय मला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यात चैतन्याची लाट पसरली आहे. राजकारणी मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. आता तिकीटासाठी चुरस सुरू होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होईल, तर तीन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबरला नेत्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. हा फक्त ३७ दिवसांचा राजकारणाचा … Read more